Vastu Tips: वास्तुशास्त्रातील या उपायांनी सुधारेल आर्थिक स्थिती, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता
वास्तुशास्त्रात दिलेल्या काही नियमांचे पालन केल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत मिळते. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
मुंबई, ज्योतिषशास्त्राप्रमाणे वास्तुशास्त्र (Vastu Tips) देखील यासाठी विविध उपाय सुचविलेले आहेत. वास्तूनुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर माणसाला सुख, समृद्धी, आनंद, वैभव आणि उत्तम आरोग्य मिळते. याशिवाय जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळविण्यासाठी वास्तुशास्त्रातील टिप्स माहिती असणे आवश्यक आहे.
- जीवनात यश मिळवण्यासाठी घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने आर्थिक लाभासोबत प्रगतीही होते.
- हिंदू धर्मात तुळशीचे रोप पूजनीय आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीला घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे. वास्तूनुसार असे केल्याने घरात सकारात्मक उर्जा राहते. तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नये.
- देवगुरू बृहस्पति हा सुख आणि समृद्धीचा कारक मानला गेला आहे. जेव्हा ग्रहाची स्थिती कमकुवत असते तेव्हा व्यक्तीला अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत गुरु ग्रहाची स्थिती अनुकूल असते. घरात आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर पुसण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते.
- वास्तुशास्त्रानुसार नळ किंवा टाक्यांमधून अनावश्यक वाहणारे पाणी अशुभ मानले जाते. घरात पाण्याची गळती होत असल्यास त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
- वास्तुशास्त्रानुसार काटेरी किंवा दुधाळ झाडे घरातून काढून टाकावीत. ऐवजी हिरवीगार झाडे लावावीत. ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा वाढेल आणि पैसा येईल.
- घरातील पूजेचे स्थान नेहमी उत्तर-पूर्व दिशेला असावे. उत्तर दिशा हि कुबेराची दिशा म्हणून ओळखली जाते. म्हणूनच वास्तूनुसार अलमिरा किंवा तिजोरीचा दरवाजा उत्तरेकडे असावा.
हे सुद्धा वाचा

व्हॉट्सॲपचे नवीन सुरक्षा फीचर! नाही काढता येणार फोटो-व्हिडिओचा स्क्रीनशॉट

Astrology: आजचे राशी भविष्य, या’ तीन राशींसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

Diabetes Tips: डायबिटीजमध्ये उपयुक्त आहे हा घटक, कोलेस्ट्रॉलदेखील ठेवते नियंत्रणात

Home Loan: गृह कर्ज घ्यायचे आहे का? जाणून घ्या कोणत्या बँकेत किती व्याजदर आहे
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)