Vastu Tips : तुमच्या किचनमधील ही वस्तू आहे फारच कामाची, वास्तु दोष होतात दूर
जर तुमच्या कामात सतत काही अडथळे येत असतील,तुमची हरवलेली वस्तू सापडत नसेल. काही विचित्र घटना घडत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात वास्तु दोष आहे.
हिरवी मिरची तुमच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. जर तुम्ही हिरव्या मिरचीचं नियमित सेवन करत असाल तर तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो. हिरव्या मिरचीचे जसे आरोग्यासाठी फायदे आहेत, तसेच तिचे वास्तु शास्त्रात देखील अनेक फायदे सांगीतले आहेत.ज्योतिष शास्त्रात हिरव्या मिरचीचे असे अनेक उपाय सांगीतले आहेत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकट दूर होऊ शकतात. जाणून घेऊयात अशाच काही उपयांबद्दल
वास्तु दोष दूर करते – जर तुमच्या कामात सतत काही अडथळे येत असतील,तुमची हरवलेली वस्तू सापडत नसेल. काही विचित्र घटना घडत असतील तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात वास्तु दोष आहे. वास्तु दोष दूर करण्यासाठी तुम्ही एका काचेच्या पाण्यानं भरलेल्या ग्लासामध्ये मिरची ठेवा, आणि सध्यांकाळच्या वेळी कोणालाही न सांगता ती मिरीच घराच्या बाहेर फेकून या यामुळे वास्तु दोष दूर होतो असं भविष्य शास्त्रात सांगितलं आहे.
आर्थिक अडचणी दूर होतील – जर तुम्हालाही वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या हातातही पैसा टिकत नसेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगितला आहे. तुम्ही तुमच्या पर्समध्ये तीन हिरव्या मिरच्या ठेवा, त्या मिरच्या सुकल्यांनंतर पुन्हा तीन मिरच्या ठेवा जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या जाणवणार नाही.
जर तुमच्या घरातील एखाद्या लहान मुलाला नजर लागली असेल तर नजर उतरवण्यासाठी देखील हिरव्या मिरचीचाच उपयोग करतात. हिरव्या मिरच्याच्या मदतीनं तुम्ही लहान मुलांची नजर उतरवू शकतात.
एवढंच नाही तर तुम्हाला ऑफिसमध्ये काही त्रास असेल, कोणासोबत जर सतत भांडणं होत असतील, शांतता मिळत नसेल तर तुम्ही जिथे बसता त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये हिरव्या मिरच्या ठेवा त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होईल.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)