Vastu Tips : हे झाड आहे खूपच शुभ, घरात लावताच नष्ट होतात सर्व वास्तुदोष
वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत, ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये केली तर वास्तुदोष आपोआप दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्ज राहाते.

घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अनेक जण आपल्याला वास्तुदोषाचा त्रास होऊ नये, यासाठी आपलं घर बांधताना वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेतात. तसेच वास्तुतज्ज्ञांनी सांगितलेल्या दिशेनुसारच घरातील वस्तू ठेवतात. मात्र घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराइतकंच परिसरातील पर्यावरणीय संतुलन देखील महत्त्वाचं असतं. तुमचं घर आणि परिसरात जर शुद्ध आणि खेळती हवा असेल तर वास्तुदोष नाहीसे होतात, व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हे महत्त्वपूर्ण असतं. वास्तुशास्त्रानुसार असे काही वृक्ष आहेत, ज्यांची लागवड तुम्ही तुमच्या घरात किंवा परिसरामध्ये केली तर वास्तुदोष आपोआप दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्ज राहाते. आज आपण अशाच काही वृक्षांबद्दल जाणून घेणार आहोत.
अशोक वृक्ष – तुम्ही जर तुमच्या घराच्या उत्तर बाजुला अशोक वृक्ष लावला तर तो वास्तुशास्त्रानुसार शुभ मानला जातो. अशोक वृक्षामुळे घरातील नकारात्मक ऊर्ज नष्ट होते. घरात सुख, शांती राहाते.
केळीचं झाड – केळीच्या झाडाला देखील शुभ मानलं गेलं आहे. केळीचं झाड तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य बाजुस ( उत्तर -पूर्व दिशेला लावू शकतात. जर तुम्ही केळीच्या झाडासोबत तुळशीचं झाड लावलं तर त्याचा परिणाम अजूनच शुभ होतो.
नारळाचं झाड – तुम्ही जर तुमच्या घराच्या सीमेवर नारळाची झाडं लावली तर ती अतिशय शुभ फळ देतात असं वास्तुशास्त्र सांगतं. यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मान-सन्मानामध्ये वाढ होते. आर्थिक स्थिरता प्राप्त होते.
वडाचं झाडं – वडाचं झाड देखील खूप शुभ मानलं जातं. हे झाड जर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला लावलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मात्र हे लक्षात असू द्या की या वृक्षाची छाया तुमच्या घरावर पडता कामा नये. घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा वृक्ष असणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.
आवळ्याचं झाड – वास्तु शास्त्रानुसार तुमच्या घराच्या सीमेवर हे झाडं असणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुमच्या घरात या वृक्षामुळे सकारात्मक ऊर्ज राहाते, तसेच या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म देखील असतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)