Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानजींची पूजा (Vastu Tips) करण्यासाठी शुभ मानले जातात. या दिवशी विधीवत भगवान हनुमानजींची उपासना केल्याने सर्व दु:ख दूर होतात.

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर
Lord-Hanuman
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 12:47 PM

मुंबई : मंगळवार आणि शनिवार हा दिवस हनुमानजींची पूजा (Vastu Tips) करण्यासाठी शुभ मानले जातात. या दिवशी विधीवत भगवान हनुमानजींची उपासना केल्याने सर्व दु:ख दूर होतात. भगवान हनुमान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. हनुमानजींना जागृत देवता मानले जाते, आजही ते पृथ्वीवर निवास करतात, अशी मान्यता आहे. जो कोणी हनुमानजींची मनापासून पूजा करतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात (Vastu Tips To Get Rid From Vastu Dosh Keep Lord Hanuman Photo In House).

जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह दोष किंवा घरात वास्तुदोष असेल तर हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि बजरंग पाठ करावे. असे केल्याने घराची नकारात्मक ऊर्जा दूर होते. वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचे वेगवेगळे फोटो कसे लावावे ते जाणून घेऊ –

दक्षिण दिशेला हनुमानजींचा फोटो लावा

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला हनुमानजींचा अधिक प्रभाव आहे. म्हणून घरात हनुमानजी यांचा फोटो दक्षिण दिशेला लावाला. या दिशेने फोटो लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नष्ट होतो. वास्तुशास्त्रानुसार, घरातील अपवित्र स्थान, पायऱ्यांखाली, स्वयंपाकघरासह काही भागात हनुमानजींचा फोटो लावू नये.

पंचमुखी हनुमानजींची मूर्ती

मान्यता आहे की ज्या घरात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती असते तिथे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. यासह देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम असते. जर तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव आहे, तर आपण हनुमानजींची शक्ती प्रदर्शन मुद्रेतील एक फोटो लावावे. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

लाल रंगाचे हनुमान

वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला लाल रंगाची हनुमानजींचा बैठा स्थितीतला फोटो लावल्यास नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. हा फोटो लावल्यास घरात आनंद आणि भरभराट होईल. याशिवाय प्रवेशद्वारात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती ठेवल्याने वाईट शक्तींचा घरात प्रवेश होत नाहीत.

भगवान हनुमानजींची एका भक्ताच्या रुपात असेलेल्या मूर्तीपुढे बसून उपासना करावी. यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

Vastu Tips To Get Rid From Vastu Dosh Keep Lord Hanuman Photo In House

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Jayanti 2021 | विवाहित आणि पिताही होते ब्रह्मचारी हनुमान, जाणून घ्या त्यांच्या पत्नी आणि पुत्राची कहाणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.