Vastu Tips | करिअरमध्ये यश हवं असेल, तर ‘या’ काही गोष्टी लक्षात ठेवा, फायदा होईल…
वास्तू शास्त्रात व्यक्तीच्या (Vastu Tips) जीवनाची निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई : वास्तू शास्त्रात व्यक्तीच्या (Vastu Tips) जीवनाची निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, यावर काय उपाय करावे हे देखील सागण्यात आलं आहे. अनेकदा आपण कठीण परिश्रम करुनही करिअरमध्ये (Career) हवं तसं यश मिळत नाही. अशावेळी मनात निराशा उद्भवते आणि आपण कामाकडे तेवढ लक्ष देऊ शकत नाही (Vastu Tips To Get Success In Career).
अनेकदा याचं कारण वास्तू दोषही असू शकतं. पण, त्यासाठी तुम्ही काही उपाय नक्की करु शकता ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल.
ऑफिसमध्ये कुठल्या दिशेने बसावं?
ऑफिसमध्ये नेहमी या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुम्ही पूर्व किंवा उत्तरच्या दिशेने मुख करुन बसावं. पश्चिम दिशेकडेही मुख करुन बसू शकता, पण कधीही दक्षिण दिशेकडे मुख करुन बसू नये.
डेस्कवर एखादं हिरवं रोप ठेवा
ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या डेक्सवर एखादं हिरवं रोप लावावं, पण या रोपाची पूर्ण काळजी घ्या. या रोपाला नेहमी पाणी देत राहा. तर आपल्या टेबलाखाली कधीही डस्टबिन ठेवू नये. जर तुम्ही डस्टबिन हटवू शकत नसाल तर दिवसभरात एकदातरी याला रिकामं करुन घ्या, जेणेकरुन यामध्ये कचरा राहणार नाही.
वडिलधाऱ्यांच्या पाया पडा
जेव्हाही तुम्ही घरातून ऑफिससाठी निघाल तेव्हा निघताना नेहमी वडिलधाऱ्यांच्या पाया पडूनच निघा. पुराणांनुसार, आई-वडिलांचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे याला तुमच्या सवयीत सहभागी करुन घ्या.
घरातून पाणी पिऊन निघा
जर तुम्ही ऑफीसच्या कुठल्या महत्त्वाच्या कामाने घरातून निघत असाल तर घरातून निघताना थोडं गुळ खा आणि पाणी पिऊनच निघा. असं करणे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे यशस्वी होण्याची शक्यताही वाढून जाते
Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूरhttps://t.co/OoMSX4Vbr4#VastuTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 24, 2021
Vastu Tips To Get Success In Career
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chanakya Niti | तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार
एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण…