Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Upay: बिना पैसे खर्च करता असा दुर करा घरातील वास्तूदोष, करा हे सोपे उपाय

आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे, ज्या प्रकारे आपले शरीर बनलेले आहे. म्हणूनच आनंदी जीवन जगण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा निर्दोष असायला हवा.

Vastu Upay: बिना पैसे खर्च करता असा दुर करा घरातील वास्तूदोष, करा हे सोपे उपाय
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:22 PM

मुंबई,  स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते जे कष्टाने विकत घेतले जाते. हे खरेदी केलेले घर तुमच्या इच्छेनुसार डिझाइन केलेले असते पण कधी कधी थोडीशी चूकही वास्तुदोषाचे कारण बनते. घरातील वास्तुदोषांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण घरात मोडतोड न करता या वास्तु उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे घरातील वास्तुदोष (Vastu Upay) सहज दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक दिशा कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते. आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे, ज्या प्रकारे आपले शरीर बनलेले आहे. म्हणूनच आनंदी जीवन जगण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा निर्दोष असायला हवा. कारण त्याचा माणसाच्या जीवनावर सर्वाधिक परिणाम होतो. अशा स्थितीत जाणून घ्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय अवलंबणे चांगले राहील.

घरातील वास्तुदोष अशा प्रकारे करा दूर

हे सुद्धा वाचा

कलश ठेवा

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना करा. कारण कलश हे गणेशाचे रूप मानले जाते. अशा परिस्थितीत भगवान गणेश तुमच्या घरात राहतील आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मुक्ती मिळवून देतील.

स्वस्तिक चिन्ह

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा. लक्षात ठेवा की स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही संपते.

घोड्याची नाल

वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालला खूप महत्त्व आहे. घरामध्ये लावल्याने वास्तुदोष दूर होतात. यासोबतच सौभाग्यही प्राप्त होते. घराच्या मुख्य दरवाजात संपूर्ण घोड्याचा नाल लावा जो U आकाराचा असेल.

पंचमुखी हनुमानजींचे चित्र

जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवावे. याचा फायदा होईल. याशिवाय प्रवेशद्वारात पंचधातूचा पिरॅमिड लावता येतो. यातून शुभ परिणामही मिळतात.

प्रकाश बल्ब

जर तुमचे स्वयंपाकघर आग्नेय कोनात म्हणजेच पूर्व-दक्षिण दिशेला नसेल तर त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो. अशा स्थितीत वास्तुदोष दूर करण्यासाठी आग्नेय कोनात छोटा बल्ब लावावा. यामुळे स्वयंपाकघरातील वास्तुदोष बऱ्याच अंशी कमी होतील.

कपूर

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर फायदेशीर ठरू शकतो. घरामध्ये ज्या ठिकाणी वास्तुदोष आहे त्या ठिकाणी कापूर लावा. यामुळे वास्तू दोष दूर होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.