Vastushastra: तुमच्याघरीसुद्धा मोजून पोळ्या बनवतात? जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
हिंदू धर्मात ताजे अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात (Vastushastra) स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या (make chapatis by counting) तर त्याचा दुष्परिणाम ( Know its side effects) घरातील लोकांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर होतो. आता काहींना वाटेल की, मोजून पोळ्या बनवणे […]
हिंदू धर्मात ताजे अन्न बनवून देवाला नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यासोबतच वास्तुशास्त्रात (Vastushastra) स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्टीचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार जर महिलांनी मोजून पोळ्या बनवल्या (make chapatis by counting) तर त्याचा दुष्परिणाम ( Know its side effects) घरातील लोकांच्या आर्थिक स्थितीवर आणि प्रगतीवर होतो. आता काहींना वाटेल की, मोजून पोळ्या बनवणे यात काय चुकीचे आहे किंवा पोळ्या मोजून नाही बनवायच्या तर कशा बनवायच्या? तर मनात एखादा आकडा ठरवून तितक्याच पोळ्या बनविणे आणि उरलेला गोळा फ्रिजमध्ये ठेवणे याला मोजून पोळ्या बनविणे म्हणता येईल. असे न करता अंदाजे पोळ्या बनवाव्या एखादी पोळी उरली तर ती घर म्हणून राहू द्यावी. सकाळी ती नाश्त्यात खावी किंवा गाईला लावावी. असे न करण्यामागे काही मान्यता आहेत त्याही जाणून घेऊया.
पहिली मान्यता ज्योतिषशास्त्रानुसार गहू सूर्य ग्रहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत सूर्य ग्रहाचा प्रभाव गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या पोळ्यावर किंवा इतर खाद्यपदार्थांवरही पडतो. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार मोजून घरात पोळ्या बनवल्या तर सूर्यदेवाचा अपमान होतो. त्याच वेळी, सूर्य ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या सन्मानावर, आत्मविश्वासावर, आरोग्यावर आणि प्रगतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
दुसरी मान्यता याशिवाय हिंदू सनातन धर्मात सकाळच्या जेवणात गायीची पहिली पोळी आणि कुत्र्याची शेवटची भाकर घेण्याची परंपरा आहे. दुसरीकडे, पोळ्या न मोजण्यामागची समजूत अशी की, जर कधी भुकेलेला माणूस घरी आला तर त्याच्यासाठीही थोडे जास्तीचे अन्न तयार असायला हवे. भुकेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने घरात नेहमी सुख आणि समृद्धी राहते. पोळ्यांचे भांडे पूर्णपणे रिकामे ठेवणे शुभ मानले जात नाही. असे म्हणतात की ज्या घरांमध्ये दररोज हा नियम पाळला जातो त्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि आई अन्नपूर्णाच्या कृपेने धान्याचा साठा भरून राहतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)