Vastu Tips: पैसे खर्च न करतादेखील दूर करता येऊ शकतो वास्तूदोष, करा हे सोपे उपाय
वास्तुदोष म्हंटल्यानंतर लोकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे यासाठी लागणार खर्च. मात्र हा केवळ एक गैरसमज आहे.
मुंबई, स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण त्यासाठी आयुष्याची जमापुंजी खर्च करतात. बऱ्याचदा एखादे घर खरेदी केल्यानंतर किंवा बांधल्यानंतर लक्षात येते की त्यात वास्तुदोष (Vastudosh) आहे. मग अनेक जण त्यासाठी खार्चिक उपाय सुचवितात, अशावेळी आपण चिंतेत पडतो. मात्र खूप पैसा खर्च केल्यावरच वास्तूदोष दूर होतो हा केवळ एक गैरसमज आहे. घरात जर वास्तुदोष (Vastu Tips) असेल तर काही सध्या उपायांनी तो दूर करता येणे शक्य आहे. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
घरातील वास्तुदोष या सोप्या उपायांनी दूर कराता येणे शक्य आहे
कलश ठेवा
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना करा. कारण कलश हे गणेशाचे रूप मानले जाते. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कलशाच्या रूपाने भगवान गणेश तुमच्या घरात राहतील आणि तुम्हाला प्रत्येक अडचणीतून मुक्ती मिळवून देतील. तसेच घरातील वास्तुदोष दूर होईल.
स्वस्तिक चिन्ह
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा. लक्षात ठेवा की स्वस्तिक नऊ बोटे लांब आणि नऊ बोटे रुंद असावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही संपते.
घोड्याची नाल
वास्तुशास्त्रात घोड्याच्या नालला खूप महत्त्व आहे. घोड्याची नाल घराच्या मुख्य दाराच्या वर लावल्याने वास्तुदोष दूर होतात. यासोबतच सौभाग्यही प्राप्त होते. लक्षात ठेवा ही नाल तुटलेली नसावी. तसेच तिला शेंदूर लावावे.
पंचमुखी हनुमानजींचे चित्र
जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. याचा फायदा होईल. याशिवाय प्रवेशद्वारात पंचधातूचा पिरॅमिड लावता येतो. यातून शुभ परिणामही मिळतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)