Vat Purnima 2023 : आज वट पौर्णिमेला अवश्य करा हे उपाय, आर्थिक अडचण होईल दूर
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत (Vat Purnima 2023) पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत पाळण्याची प्रथा आहे. तसेच हे व्रत पाळल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे.
मुंबई : आज जेष्ठ पौर्णिमा आहे यालाच महाराष्ट्रात वट पौर्णिमा (Vat Purnima 2023) म्हणतात. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात. याशीवाय पौर्णिमेला साता लक्ष्मीची पुजा करणेही फलदायी मानल्या जाते. या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती राहत नाही. वट सावित्रीला कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊया.
हरभरा दान करा
वट सावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे. या दिवशी 2.5 किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे. जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर 1.25 किलो काळे हरभरे दान करा. याशिवाय वट सावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे. हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल.
पुरुषांनीही हा उपाय करावा
वट सावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी 108 वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी. असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते.
वटवृक्षाला दुध अर्पण करावे
या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावे.
गरजूंना अन्नदान करा
वट सावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरीबांना अन्नदान करा. खीर खायला द्या. या उपायाने धन, समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे.
हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा
वट सावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जाप करा आणि हवन करा. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दिर्घायू लाभते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)