Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला का करतात वडाच्या झाडाची पुजा? 99 टक्के लोकांना नाही माहिती खरे कारण

महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा (Vat Purnima 2023) व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. देशाच्या इतर सर्व भागात वट सावित्री वट जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला केली जाते.

Vat Purnima 2023 : वट पौर्णिमेला का करतात वडाच्या झाडाची पुजा? 99 टक्के लोकांना नाही माहिती खरे कारण
वट पौर्णिमाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 1:54 PM

मुंबई : वट सावित्री व्रत यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाईल. गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा (Vat Purnima 2023) व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. देशाच्या इतर सर्व भागात वट सावित्री वट जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला केली जाते. पंचांगानुसार 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सकाळी 11 वाजून 17 मिनीटाने पैर्णिमा प्रारंभ होईल व दुसऱ्या दिवशी 4 जूनला सकाळी 9.11 वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. या काळात वड पूजा करता येईल.

वडाच्या झाडाचे महत्त्व

वटवृक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या निवासाशिवाय आणखी एक महत्त्वाची घटना या वृक्षाशी निगडीत आहे. धार्मिक पौराणिक कथेनुसार, वडाच्या झाडाखाली देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन दिले. देवी सावित्रीला तिचा नवरा पुन्हा मिळाला होता, म्हणून स्त्रिया हे व्रत पाळतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. याशिवाय जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनीही अक्षय वटखाली तपश्चर्या केल्याचे मानले जाते. प्रयागमधील हे ठिकाण भगवान ऋषभदेवांची तपस्थळी म्हणून ओळखले जाते.

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे करा वट सावित्रीचे व्रत

  • वट सावित्री व्रताच्या दिवशी विवाहित महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात.
  • स्नान करून व्रताचे संकल्प करावे.
  • तसेच या दिवशी पिवळे सिंदूर लावणे शुभ मानले जाते.
  • या दिवशी सावित्री-सत्यवान आणि यमराज यांची मूर्ती वटवृक्षाखाली ठेवावी.
  • वटवृक्षात पाणी टाकून त्याला फुले, अक्षत, मिठाई अर्पण करावी.
  • सावित्री-सत्यवान आणि यमराजाच्या मूर्ती ठेवा. वटवृक्षाला पाणी अर्पण करावे.
  • झाडाला रक्षासूत्र बांधून आशीर्वाद घ्या.
  • झाडाभोवती सात परिक्रमा करा.
  • यानंतर हातात काळे हरभरे घेऊन या व्रताची कथा ऐकावी.
  • कथा ऐकल्यानंतर पंडितजींना दान द्यायला विसरू नका.
  • वस्त्र, पैसा, हरभरा दान करा.
  • दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी वटवृक्षाचे कोपल खाऊन उपवास सोडावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.