Vat Purnima 2022: वडाला धागा गुंडाळताना म्हणा ‘हा’ मंत्र; होतील सर्व मनोकामना पूर्ण

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्व आहे. यंदा म्हणजेच 2022 मध्ये 14 जूनला वटपौर्णिमा (2022 vat purnima muhurta) येत आहे. या दिवशी स्त्रिया  वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घालतात. यामागे एक प्राचीन कथा (vat purnima importance) आहे. वट सावित्री व्रत कथेनुसार प्रतिन काळात अश्वपती नावाच्या राजाचे एक राज्य होते. राजाला मूलबाळ नव्हते. राजाने अनेक वर्षे यज्ञ, […]

Vat Purnima 2022: वडाला धागा गुंडाळताना म्हणा 'हा' मंत्र; होतील सर्व मनोकामना पूर्ण
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:45 PM

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्व आहे. यंदा म्हणजेच 2022 मध्ये 14 जूनला वटपौर्णिमा (2022 vat purnima muhurta) येत आहे. या दिवशी स्त्रिया  वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत सात प्रदक्षिणा घालतात. यामागे एक प्राचीन कथा (vat purnima importance) आहे. वट सावित्री व्रत कथेनुसार प्रतिन काळात अश्वपती नावाच्या राजाचे एक राज्य होते. राजाला मूलबाळ नव्हते. राजाने अनेक वर्षे यज्ञ, हवन व दान-दान केले. त्यानंतर सावित्रीदेवीच्या आशीर्वादाने सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. राजाने त्या मुलीचे नाव सावित्री ठेवले. सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली, तेव्हा न्याने तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. राजाने आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे काम राजकुमारीवरच  सोपवले. असे म्हणतात की, एके दिवशी राजकुमारी सावित्रीने जंगलात जाताना एका सुंदर तरुणाला पाहिले आणि त्याचीच आपला पती म्हणून निवड केली. त्या तरुणाचे नाव होते सत्यवान. सत्यवान राजा द्युमत्सेनचा पुत्र होता. शत्रूकडून पराजय झाल्यानंतर तो जंगलात राहू लागला. एके दिवशी वडाच्या झाडावरून पडून सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी आले असतात सावित्रीने तीही तिच्या पतीसोबत येईल असा अट्टहास धरला, परंतु हे नियमाविरिध असल्याचे सांगत यमराजाने सावित्रीची समजूत काढली. सावित्रीने अट्टहास करीत यमराजासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी यमराजाला सत्यवानाचे प्राण प्रत करावे लागले.

हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात. तसेच आपल्या पतीच्या दीघायुष्यासाठी प्रार्थना करतात. सात जन्म हाच पती मिळूदे म्हणून प्रार्थनाही करतात. वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः ! वटाग्रे तू शिवो देवःसावित्री वटसंश्रिता !! या मंत्राचा जप करावा. यामुळे इच्छित फलप्राप्ती होते.

कशी करावी पूजा?

जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी. या दिवशी श्रृंगार करावा. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करावी. वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.

हे सुद्धा वाचा

वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य-

सावित्री आणि सत्यवानची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद-कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू

वटपौर्णिमा मुहूर्त (Vat Purnima muhurta 2022) –

पौर्णिमा प्रारंभः 13 जून 2022 रोजी उत्तर रात्रौ 9 वाजून 03 मिनिटे.

पौर्णिमा समाप्तीः 14 जून 2022 रोजी सायं. 05 वाजून 22 मिनिटे

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.