Vat Savitri 2023 : पतीच्या दिर्घायुष्यासाठी ठेवले जाते वट सावित्रीचे व्रत, काय आहे मुहूर्त आणि महत्व?

असे म्हटले जाते की, हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. या वर्षी वट सावित्री व्रत कधी साजरी होणार आहे ते जाणून घेऊया.

Vat Savitri 2023 : पतीच्या दिर्घायुष्यासाठी ठेवले जाते वट सावित्रीचे व्रत, काय आहे मुहूर्त आणि महत्व?
वट सावित्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:35 AM

मुंबई : सनातन धर्मात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला वट सावित्री व्रत (Vat Savitri 2023) पाळतात. या दिवशी, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी, दिवसभर निर्जल उपवास केला जातो. असे म्हटले जाते की, हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. या वर्षी वट सावित्री व्रत कधी साजरी होणार आहे ते जाणून घेऊया.

वट सावित्री व्रत 2023 तारीख

यावर्षी वट सावित्री व्रत 3 जुन 2023 रोजी होणार आहे. पंजाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या वेळी 3 जून रोजी येणाऱ्या ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत केले जाणार आहे.

वट सावित्री व्रत 2023 अमावस्या मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी वट सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त 3 जुन 2023 रोजी सकाळी 11.17 मी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.11 पर्यंत असेल. तथापि, उदयतिथीनुसार हे व्रत 3 जुन रोजीच पाळणे योग्य ठरेल.

हे सुद्धा वाचा

वटवृक्षाच्या पूजे मागचे धार्मिक महत्व

वटवृक्षाच्या खोडात विष्णु, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडाच्या बऱ्याच फाद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असं मानलं जातं. मनातील इच्छा पूर्ण होतात. संतान प्राप्ती साठी देखील अनेक स्त्रियां वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाचे आयुष्य हे लांब असते. ज्येष्ठ महिन्यातील अमावस तिथीला वट वृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुर्नजीवन मिळवून दिले होते. यादिवसापासून वट वृक्षाची पूजा केली जाऊ लागली. पिंपळाच्या झाडाला विष्णु देवाचे प्रतीक मानले जाते. तसंच वटवृक्षाला शिव शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावृक्षाची पूजा करणं शंकराची पूजा करण्यासारखं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.