रात्रभर झोपली नाही, सकाळी पळतच रशियन तरुणी पोहोचली बाबा खाटू श्याम मंदिरात, म्हणाली माझ्यासोबत..
बाबा खाटू श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त गर्दी करत असतात. केवळ देशातीलच नाही तर विदेशातून देखील भाविक बाबा खाटू श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी येतात.

बाबा खाटू श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी देशभरातील भक्त गर्दी करत असतात. केवळ देशातीलच नाही तर विदेशातून देखील भाविक बाबा खाटू श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी येतात, आम्ही जे पण बाबांकडे मागतो ते आम्हाला मिळतं अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. एक रशियन तरुणी देखील बाबा खाटू श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचली, त्यानंतर तिने तिथून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कोको असं या रशियन मुलीचं नाव आहे. ती ब्लॉगर आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तीनं म्हटलं की माझं लवकर दर्शन झालं कारण माझ्यासोबत माझ्या कॅबचा ड्रायव्हर देखील होता. त्याने केलेल्या मदतीमुळे मी बाबांचं लवकर दर्शन घेऊ शकले.
पुढे तीने आपल्या या व्हिडीओमध्ये म्हटलं की, मी बाबा खाटू श्याम यांची मोठी भक्त आहे. मी यापूर्वी देखील अनेकदा बाबा श्याम यांचं दर्शन घेण्यासाठी इथे आली आहे. मी बाबांकडे आतापर्यंत जे-जे मागितलं त्या-त्या माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. माझा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ही देखील त्यांचीच कृपा आहे. या व्हिडीओमध्ये ही रशियन तरुणी खूप आनंदी दिसत आहे. एक वेगळाच उत्साह तिच्यामध्ये दिसून येत आहे.
या व्हिडीओमध्ये कोकोने म्हटलं की, मी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले. मी रात्री उशिरापर्यंत जागीच होते. त्यानंतर पहाटेच उठून तयार झाले आणि जयपूरवरून खाटूला येण्यासाठी कॅब बुक केली. त्यानंतर मला कॅब चालकानं खाटूला ड्रॉप केलं. मी त्याला माझ्यासोबत दर्शनासाठी येण्याची विनंती केली. त्याने माझी विनंती मान्य केली. तो माझ्यासोबत दर्शनला आला. त्यामुळे मला कुठलीही अडचण न येता दर्शन घेता आलं. माझं दर्शन लवकर झालं असं या रशियन तरुणीनं म्हटलं आहे. तरुणीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.