Vidur Neeti : जीवनात पुढे जायचे असेल तर या पाच सवयी लगेच सोडा
Vidur Niti महात्मा विदुर हे महाभारत काळातील सर्वात बौद्धिक मानले जातात. त्यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते लोकांना वेळेपूर्वी येणाऱ्या परिस्थितीची माहिती देत असत.
मुंबई : भारतात अनेक मोठे राजकारणी होऊन गेले. भीष्मांप्रमाणेच विदुर, मनू, चार्वाक, शुक्राचार्य, बृहस्पती, परशुराम, गर्ग, चाणक्य, भर्तृहरि, हर्षवर्धन, बाणभट्ट इत्यादी अनेक नीतिवादी झाले आहेत. महात्मा विदुर (Vidur Niti) हे त्यापैकीच एक होते. विदुर हा धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ जो एका दासीचा मुलगा होता. चला जाणून घेऊया विदुर यांनी अशा कोणत्या 5 सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. तसेच हे मुर्ख व्याक्तीचे लक्षण माणल्या जाते.
या पाच सवयी लगेच सोडा
1. क्रोध: महात्मा विदुर म्हणतात की क्रोध हा मनुष्याचा शत्रू आहे. वासना, क्रोध आणि लोभ हे तीन प्रकारचे अवगुण दु:खात नेणारे आहेत. हे तिघे आत्म्याचा नाश करणारे आहेत, त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी दूर राहावे.
2. मत्सर: मत्सर, इतरांचा द्वेष, असंतुष्ट, राग, संशयी आणि आश्रित (इतरांवर अवलंबून) हे सहा प्रकारचे लोकं नेहमी दुःखी राहतात. या गोष्टी जीवन अंधारमय करतात. म्हणूनच मत्सर करण्याऐवजी निरोगी सकारात्मक प्रेरणांसह स्पर्धा करा. असंतुष्ट होण्याऐवजी, जे तुम्हाला समाधान देईल त्यासाठी प्रयत्न करा. रागावणे आणि संशयास्पद असणे आपले सर्व नातेसंबंध नष्ट करते. म्हणून प्रेम आणि विश्वास ठेवायला शिका. प्रत्येक माणसाला त्याच्या मार्गाने मुक्त होऊ द्या.
3. विश्वास ठेवणे: जो विश्वास ठेवण्यास पात्र नाही त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. पण जे भरवशाचे आहे त्यावर अवश्य विश्वास ठेवावा. श्रद्धेतून निर्माण होणारी भीती मूळ उद्देशही नष्ट करते. तथापि, महात्मा विदुर असेही म्हणतात की जो मनुष्य सत्कर्म आणि इतरांवर विश्वास ठेवत नाही, तो स्वभावाने संशयास्पद राहतो. तो इतरांशी असलेले आपले नाते खराब करतो.
4. स्वतःची स्तुती करणे: आपली स्तूती व्हावी असे प्रत्त्येकालाच वाटते पण स्वःताच सःताची स्तुती करणे मुर्खपणाचे लक्षण आहे. स्वःताची स्तुती करून इतरांना नाव-बोटं ठेवणाऱ्याला कुणीच पसंत करत नाही.
5. मूर्खपणा: मूर्ख मनाचा नीच माणूस न बोलवता आत येतो, न विचारता बोलू लागतो आणि विश्वासार्ह नसलेल्यांवरही विश्वास ठेवतो. महात्मा विदुर म्हणतात की माणसाची ही सवय त्याचे आयुष्य उध्वस्त करतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)