Vidur Neeti : जीवनात गाठायचे असेल यशाचे शिखर तर, विदूर नितीच्या या गोष्टी कायम ठेवा लक्षात
हस्तिनापूरचे महाराज, धृतराष्ट्र यांचे प्रमुख सल्लागार आणि महामंत्री म्हणून विदुर कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत. विदुरांना धर्मराजाचा अवतार म्हणूनही ओळखलं जातं. विदुन हे कुटनिती, राजकारण आणि अर्थशास्त्रात तज्ज्ञ होते. विदुर यांनी व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही यश मिळवू शकता.
मुंबई : महात्मा विदुर महाभारत काळाततील विद्वान व्यक्तीमत्त्व होते. महात्मा विदुरांची हुशारी आणि धोरणे आजही महान आहेत. विदुर नीती (Vidur Neeti Marathi) हा माणसाच्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. विदुर हा धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ होता. विदुन हे कुटनिती, राजकारण आणि अर्थशास्त्रात तज्ज्ञ होते. विदुर यांनी व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही यश मिळवू शकता. विदुर नीतिनुसार वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे दरवाजे आहेत. या तीन गोष्टी आत्म्याचा नाश करणाऱ्या आहेत. म्हणून काम, क्रोध, लोभ यापासून दूर राहा.
विदूर नितीनुसार यशस्वी होण्यासाठी या गोष्टींचे करा आचरण
- माणसाने आयुष्यात चांगले काम केले पाहिजे. चांगले कर्म करणाऱ्याला पंडित म्हणतात.
- विदुर नीतीनुसार, जे लोक विश्वासार्ह नाहीत त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जे विश्वासार्ह आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा.
- विदुर नीतिनुसार, जर तुमचा आदर केला जात असेल तर जास्त आनंदी होऊ नका. तसेच, अपमान केल्यावर रागावू नका. हे गुण तुम्हाला बुद्धिमान व्यक्ती बनवतात.
- विदुर नीतीनुसार मन खूप चंचल असते. जी व्यक्ती आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो कधीच यशस्वी होत नाही. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही काहीही साध्य करू शकता.
- महात्मा विदुर म्हणतात की, कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा. कामात यश निश्चित आहे.
- विदुर नीतीनुसार जो बलवान असतो तो क्षमा करू शकतो. तो गरीब असल्यास दान करू शकतो. त्या व्यक्तीला स्वर्गात स्थान मिळते.
- सत्य हेच सर्वस्व आहे, असं विदुर यांचं ठाम मत. जी मंडळी सत्याला तुच्छ लेखतात त्यांचं चित्त कधीच थाऱ्यावर नसतं. त्यांच्या मनाला कधीच शांतता लाभत नाही, सर्वकाही असूनही ही मंडळी कसल्या न कसल्या शोधात असतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)