Vijaya Ekadashi 2023 : श्री रामाने केले होते विजया एकादशीचे व्रत, जाणून घ्या व्रताचे महत्व आणि तिथी

या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते. विजया एकादशीला उपासना केल्याने सर्वात शक्तिशाली शत्रूंचा पराभव होऊ शकतो.

Vijaya Ekadashi 2023 : श्री रामाने केले होते विजया एकादशीचे व्रत, जाणून घ्या व्रताचे महत्व आणि तिथी
एकादशी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 9:41 AM

मुंबई, उपवासांपैकी नवरात्री, पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी हे मुख्य व्रत आहेत. त्यातही एकादशी हे सर्वात मोठे व्रत मानले जाते. चंद्राच्या स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम होतो, अशा स्थितीत एकादशीचे व्रत केल्यास चंद्राचे वाईट प्रभाव थांबू शकतात. एकादशीचे व्रत करूनही ग्रहांचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. नावानुसार विजया एकादशीला (Vijaya Ekadashi 2023) विजय मिळवून देणारी मानली जाते. या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केली जाते. या एकादशीचे व्रत केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते. विजया एकादशीला उपासना केल्याने सर्वात शक्तिशाली शत्रूंचा पराभव होऊ शकतो. यावेळी विजया एकादशीच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे की, विजया एकादशी 16 फेब्रुवारीला साजरी होणार की 17 फेब्रुवारीला.

विजया एकादशी शुभ मुहूर्त

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशीचे व्रत केले जाते. यावेळी विजया एकादशी 16 फेब्रुवारी आणि 17 फेब्रुवारी या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल. विजया एकादशीची तारीख 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 05.32 वाजता सुरू होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 02.49 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, विजया एकादशी 16 फेब्रुवारीलाच साजरी केली जाईल. वैष्णव समाजाची एकादशी 17 फेब्रुवारीलाच साजरी होणार आहे. विजया एकादशीचे पारण 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:01 ते 09:13 पर्यंत असेल.

विजया एकादशीची पूजा पद्धत

विजया एकादशीच्या दिवशी श्री हरीची कलशावर स्थापना करावी. यानंतर भक्तीभावाने श्रीहरीची पूजा करावी. कपाळावर पांढरे चंदन किंवा गोपी चंदन लावून पूजा करावी. त्यानंतर पंचामृत, फुले आणि ऋतुनुसार फळे अर्पण करा. या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, आहार घ्यायचा असेल तर सात्विक आहार घ्या. संध्याकाळी अन्न ग्रहण करण्यापूर्वी पूजा आणि आरती करा. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच कलश आणि अन्न व वस्त्र दान करा.

हे सुद्धा वाचा

विजया एकादशीची या गोष्टी  पाळा

1. उपवास ठेवलात तर खूप चांगलं होईल, नाहीतर सात्विक अन्न एका वेळी घ्यावं.

2. विजय एकादशीच्या दिवशी भात आणि जड अन्न खाऊ नये.

3. या दिवशी रात्री भगवान विष्णूची पूजा करणे आवश्यक आहे.

4. या दिवशी रागावू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि आचरणावरही नियंत्रण ठेवा.

विजया एकादशी व्रताची कथा

असे म्हणतात की त्रेतायुगात भगवान श्रीराम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते, तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम यांनी समुद्र देवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती, परंतु समुद्रदेवतेने श्रीरामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही. वक्दलाभ्य मुनींच्या आदेशाने रामाने विजया एकादशीचे व्रत पाळले, ज्याच्या प्रभावाने समुद्राने रामाला मार्ग दिला. यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले आणि तेव्हापासून ही  विजया एकादशी म्हणून ओळखली जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.