Vinayaka Chathurti 2022: उद्या विनायक चतुर्थी; जुळून येत आहेत ‘हे’ चार विशेष योग
कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी विनायक चतुर्थीला उपवास केला जातो. इच्छित फलप्राप्तीसाठीसुद्धा विनायक चतुर्थीला उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते.
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जून 2022 (Vinayaka Chathurti 3 june 2022) रोजी आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी (Vinayaka Chathurti 2022) असेही म्हणतात. हिंदू धर्मानुसार या पवित्र दिवशी गणपतीची पूजा केली जाते. असे केल्याने विघ्नहर्त्याची कृपा भक्तांवर सदैव राहते, असे मानले जाते. भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय दैवत आहे. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. कुटुंबात सुख-समृद्धी कायम राहावी यासाठी विनायक चतुर्थीला उपवास केला जातो. इच्छित फलप्राप्तीसाठीसुद्धा विनायक चतुर्थीला उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते.
विनायक चतुर्थीचा मुहूर्त-
चतुर्थी तिथी शुक्रवार, 3 जून रोजी सकाळी 10:56 पासून सुरू होईल तसेच 4 जून रोजी दुपारी 01:43 वाजता समाप्त होईल. (Vinayak Chaturthi 2022 Know The Puja Vidhi And Shubh Muhurt)
विनायक चतुर्थीला हे चार विशेष योग जुळून येत आहेत-
विनायक चतुर्थीच्या दिवशी वृद्धी, ध्रुव, सर्वार्थ सिद्धी आणि रवि हे चार योग जुळून येत आहेत. हे योग शास्त्रात अतिशय शुभ मानले गेले आहेत. हिंदू पंचांगानुसार, सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 05:23 ते संध्याकाळी 07:05 पर्यंत राहील.
विनायक चतुर्थी पूजा विधी-
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर गंगाजलाने गणेशाची पूजा करावी. यानंतर श्रीगणेशाला स्वच्छ वस्त्र परिधान करावे. श्रीगणेशाला शेंदूर वाहून दुर्वा अर्पण कराव्या. भगवान गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. श्रीगणेशाला दुर्वा अर्पण केल्याने त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. गणेशाची पूजा करून नैवेद्य दाखवावा. गणपतीला मोदक किंवा लाडू नैवैद्य दाखवू शकता. या दिवशी गणपतीचे जास्तीत जास्त ध्यान करावे. एखादे नवे काम करू इच्छित असाल तर विनायक चतुर्थी हा शुभ मुहूर्त आहे. श्री गणेशाचे स्मरण करून नवीन कमला सुरवात केल्यास भरभराट होईल. तसेच श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी मुगाचे लाडू अर्पण करावेत. पुढील 7 दिवस बुधवारपर्यंत रोज केल्यास याचे इच्छित परिणाम दिसून येतील. असे केल्याने श्रीगणेश तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करतील. तसेच हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.
आख्यायिका-
शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. यावेळी शंकरांनी त्रिशुलाने त्याचे मुंडके उडवले. तो दिवस एकादशीचा होता.
(वरील माहिती धार्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रद्धेशी हुठ्लाही संबंध नाही)