Vinayak Chaturthi 2023 : उद्या विनायक चतुर्थीला अशा प्रकारे करा पूजा, होतील सर्व मनोकामना पूर्ण

भगवान गणेश आणि चंद्र यांच्या संयोगाने निर्माण झालेल्या चतुर्थींचे महत्त्व सर्व पौराणिक ग्रंथांमध्ये तपशीलवार वर्णन केले आहे. गणेश ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे, जिच्या उपासनेने जीवनाला दिशा मिळते.

Vinayak Chaturthi 2023 : उद्या विनायक चतुर्थीला अशा प्रकारे करा पूजा, होतील सर्व मनोकामना पूर्ण
ganpatiImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 7:07 PM

मुंबई : अधिसमास सुरू झाला आहे. या कालावधीतील पहिल्या अधिक श्रावण शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीचा (Shrawan Vinayak Chaturthi)  उत्सव शुक्रवार, 21 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान गणेश आणि चंद्र यांच्या संयोगाने निर्माण झालेल्या चतुर्थींचे महत्त्व सर्व पौराणिक ग्रंथांमध्ये तपशीलवार वर्णन केले आहे. गणेश ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे, जिच्या उपासनेने जीवनाला दिशा मिळते. भगवान गणेश हे चतुर्थी तिथीचे, श्री विष्णू अधिकमासाचे आणि श्रावण महिन्याचे भगवान शिव देवता आहेत. अशा प्रकारे या चतुर्थीच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान केल्याने या तिन्ही देवांची कृपा सहज प्राप्त होऊ शकते. विनायक चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि समृद्धी मिळते, सर्व संकटे दूर होतात.

नियमानुसार करावी पूजा

सकाळी स्नान करून पाण्याने, पंचामृत रोळी, अक्षत, सुपारी, जनेयू, सिंदूर, फुले, दुर्वा इत्यादींनी गणपतीची पूजा करावी. नंतर लाडूंचा नैवेद्य दाखवून दिवे व उदबत्तीने त्यांची आरती करावी. सुख-समृद्धीच्या इच्छेने गणेशाच्या ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी सम्प्रभ’ या मंत्राचा जप करा. पूजा करताना काही वास्तु नियम लक्षात ठेवा, असे केल्याने पूजेचे फळ वाढते.

गणपतीला स्थापित करण्यासाठी पूर्व, ईशान्य किंवा ब्रह्म स्थान शुभ मानले जाते. पूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. पूजेत निळ्या आणि काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत. त्यांच्या पूजेमध्ये लाल, पिवळे, गुलाबी, हिरवे किंवा भगवे रंगाचे कपडे घालणे चांगले मानले जाते. गणेशजी हे विघ्न दूर करणारे देवताआहेत, त्यांचे पूजन केल्याने वास्तूदोषसुद्धा दूर होतो.

हे सुद्धा वाचा

चंद्रदर्शनाचे पौराणिक महत्त्व

सौभाग्य, संतती, संपत्ती, पतीचे रक्षण आणि संकट टाळण्यासाठी चंद्रदेवाची पूजा केल्याचा शास्त्रात उल्लेख आहे. सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर समाप्त होते. या दिवशी चंद्रोदयानंतर एका भांड्यात पाणी भरून त्यामध्ये लाल चंदन, फुले, अक्षत, साखर इत्यादी टाकून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे.  चंद्राला दिलेले हे अर्घ्य सौभाग्य वाढवतो. विनायक चतुर्थीचे शुभ व्रत पाळल्याने मनुष्याला धन-धान्य प्राप्त होते.त्याला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही. चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थितीही मजबूत होते. शास्त्रानुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, कारण या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटा आळ येतो अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.