Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी…

दर महिन्याच्या विनायक चतुर्थीला शुक्ल पक्षाच्या (पौर्णिमा) चतुर्थी तिथीला (Vinayak Chaturthi On 16th April 2021) साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, विनायक चतुर्थी पौर्णिमा किंवा अमावस्येनंतर येते, अर्थात चंद्र महिन्यातील अमावस्या.

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी...
Lord Ganesha
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:29 AM

मुंबई : दर महिन्याच्या विनायक चतुर्थीला शुक्ल पक्षाच्या (पौर्णिमा) चतुर्थी तिथीला (Vinayak Chaturthi On 16th April 2021) साजरी केली जाते. हिंदू पंचांगानुसार, विनायक चतुर्थी पौर्णिमा किंवा अमावस्येनंतर येते, अर्थात चंद्र महिन्यातील अमावस्या. या दिवशी, भक्त भगवान श्री गणेशाची पूजा करतात आणि धन- समृद्धीसाठी उपवास करतात (Vinayak Chaturthi On 16th April 2021 Know The Shubh Muhurt And Puja Vidhi).

हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि त्यांच्या भक्तांना समस्यांचा सामना करावा लागतो. हे एकमात्र कारण आहे की त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जाते. या महिन्यात आज 16 एप्रिल 2021 च्या शुभ दिवशी आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाते.

विनायक चतुर्थी एप्रिल 2021 तिथी आणि शुभ मुहूर्त

दिनांक : 16 एप्रिल, 2021

शुभ तिथी 15 एप्रिलला दुपारी 3:27 वाजता

शुभ तिथी समाप्त : 16 एप्रिलला सायंकाळी 6:05 वाजता

विनायक चतुर्थी एप्रिल 2021 पूजाविधी

– या दिवशी गणेशाच्या भक्तांनी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि नवीन, स्वच्छ कपडे घालावे.

– एक दिवसाचा उपवास ठेवावा.

– या दिवशी भगवान गणेशाची पूजा करावी, मंत्रांचा जप करा आणि आरती करा. त्याशिवाय, भगवान गणेशाला दुर्वा, कुंकूचा तिळा आणि चंदनची 21 माळा चढवा.

– भगवान गणेशाला मोदक, खीर आणि फळ यांचं नैवेद्य दाखवावं.

विनायक चतुर्थीला या मंत्रांचा जप करा –

“ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”

“गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा ​​भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”

“वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा”

विनायक चतुर्थी 2021 एप्रिलचं महत्व

हिंदू मान्यतेनुसार, भगवान गणेश विद्या, बुद्धी, समृद्धी, सौभाग्याचे प्रतीक आहेत आणि आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात. त्यामुळे जर लोक विनायक चतुर्थीच्या दिवशी त्यांची पूजा कराल, त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना भगवान गणेश पूर्ण करतील.

कोरोना महामारीवेळी भगवान गणेशाची पूजा करणे अत्यंत श्रेयस्कर असेल. तुम्ही आपआपल्या घरात गणपतीची विधीवत पूजा करावी जेणेकरुन कोरोनाचा वाढता प्रसार रोखता यावा आणि या जगातून कोरोना पूर्णपणे मिटावा.

Vinayak Chaturthi On 16th April 2021 Know The Shubh Muhurt And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

जन्म घेताच भगवान कार्तिकेयचं अपहरण झालं होतं, जाणून घ्या या पौराणिक कथेबाबत…

Kalki Avtar | भगवान विष्णू कल्की जन्म कधी घेणार? जाणून घ्या शास्त्रांत काय लिहिलंय…

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.