Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व
विनायक चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते (Vinayaka Chaturthi 2021), जी शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते आणि प्रत्येक महिन्यात अमावस्येला किंवा अमावस्येनंतर येते.
मुंबई : विनायक चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून देखील ओळखले जाते (Vinayaka Chaturthi 2021 ), जी शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते आणि प्रत्येक महिन्यात अमावस्येला किंवा अमावस्येनंतर येते. हा दिवस हिंदू आणि विशेषकरुन महाराष्ट्रातील लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, कारण हा दिवस गणपतीच्या जन्माच्या दिवसाचं प्रतीक आहे. या महिन्यात हा पवित्र दिवस 15 मे 2021 रोजी म्हणजेच आज शनिवारी साजरा केला जात आहे. या दिवशी भाविक दिवसभराचा उपवास ठेवतात आणि आशीर्वाद घेण्यासाठी भगवान गणेशाची पूजा करतात (Vinayaka Chaturthi 2021 Know The Importance Of This Day).
मान्यतेनुसार, गणेशाला विघ्नहर्ता रुपातही ओळखलं जातं, कारण ते आपल्या भक्तांवरील सर्व विघ्न दूर करतात.
विनायक चतुर्थी तिथी आणि शुभ मुहूर्त
तिथी : 15 मे 2021
शुभ दिवस प्रारंभ : सकाळी 07:59, 15 मे
शुभ दिवस समाप्त : सकाळी 10 वाजता, 16 मे
विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा कशी करावी?
– सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला
– सर्व पूजा सामग्री गोळा करुन दुपारच्या सुमारास पूजेला सुरु करतात
– गणपतीला पवित्र पाण्याने अभिषेक करा, त्यांना नवीन कपडे घाला आणि कुंकवाने टिळा लावा.
– उदबत्ती लावा आणि त्यांना दूर्वा अर्पण करा
– “ऊं गण गणपतय नमः” या मंत्राचा जप करा
– त्यांना प्रसाद म्हणून बुंदीचे 21 लाडू अर्पण करा
– आरती करुन आपली पूजा पूर्ण करा
विनायक चतुर्थी मे 2021 चे महत्त्व
भगवान गणेश विनायक, विघ्नहर्ता, एकदंत, पिल्लईयार आणि विनायक हेरंब अशा अनेक नावांनी परिचित आहेत. हिंदूंच्या मते, दुपारदरम्यान चतुर्थीला गणेशाची पूजा करणे शुभ असते. तसेच, ज्या विवाहित जोडप्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्यांनी सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी या दिवशी उपास करावा. भगवान गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या इच्छांची पूर्तता करतात आणि त्यांना ज्ञान आणि संयम देऊन आशीर्वाद देतात.
यावेळी कोरोना साथीच्या आजारामुळे विनायक चतुर्थीचा हा सणही घरातच साजरा केला जाणार आहे. पण तुम्ही घरीच हा उत्सव तुम्ही खूप चांगल्या आणि आनंदी मनाने साजरा करु शकता.
त्वचे संबंधी रोग, व्यवसायात नुकसान, या समस्यांपासून बचावासाठी बुधवारचा उपवास ठेवा, जाणून घ्या याबाबत सर्व माहितीhttps://t.co/W2HJ0hT65P#BudhwarVrat
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
Vinayaka Chaturthi 2021 Know The Importance Of This Day
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lord Shree Ganesha | भगवान गणेशाला तुळस अर्पण का केली जात नाही? जाणून घ्या ही पौराणिक कथा
Lord Vishnu | वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा, ‘या’ मंत्राचा जप करा