सात हजार किलो शाडूच्या मातीपासून साकारली माऊलीची 35 फूट उंच मूर्ती
पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विनोद येलारपूरकर (Vinod Yelapurkar) यांनी आषाढी एकादशीचे औचीत्त्य साधून विठू माऊलीची 35 फूट उंच मूर्ती (35 feet Vitthal murti) साकारली आहे. सातारा जिल्ह्मातील वाईजवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या (Ashadhi ekadashi 2022) दिवशी मूर्ती ठेवण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार […]
पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार विनोद येलारपूरकर (Vinod Yelapurkar) यांनी आषाढी एकादशीचे औचीत्त्य साधून विठू माऊलीची 35 फूट उंच मूर्ती (35 feet Vitthal murti) साकारली आहे. सातारा जिल्ह्मातील वाईजवळील कुडाळ गावात आषाढी एकादशीच्या (Ashadhi ekadashi 2022) दिवशी मूर्ती ठेवण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यांपासून विनोद येलारपूरकर ही मूर्ती साकारात असून त्याकरिता त्यांना स्टुडिओतील सहा ते सात कलाकार मदत करत आहेत. सिव्हिइलेक प्रोजेक्ट कंपनीचे संचालक दत्तात्रय भालेगरे व कमलेश भालेगरे यांनी ही मूर्ती तयार करण्याची कल्पना येलारपूरकर यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार सुबक मूर्ती बनविण्यात आली आहे.
ही मूर्ती बनविण्याकरिता सात हजार किलो शाडूची माती लागली, असे येलारपूरकर यांनी सांगितले. दीड हजार किलो वजनाचा लोखंडी सांगाडा व फायबर वापरण्यात आले. त्यामुळे हवा, पाणी आणि अन्य कोणत्याही वातावरणात मूर्ती खराब होणार नाही. मूर्ती विष्णुरूपात साकारली आहे. मूर्तीच्या उजव्या हातात कमलपुष्प आणि डाव्या हातात शंख आहे. काळ्या पाषाणासारखे रूप या मूर्तीला देण्यात आल्याने ती विलोभनीय दिसत आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |
विविध माध्यमांत काम
विनोद येलारपूरकर यांनी शिल्पकलेचे शिक्षण सर जे जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले आहे. 2004 पासून व्यावसायिक शिल्पकार, मूर्तिकार म्हणून ते कास करत आहेत. त्यांनी दीडशेहून अधिक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. विविध शिल्पं भितिचित्रं त्यांनी केली आहेत. थ्रीडी, धातू, लाकूड,फायबर अशा विविध माध्यमांत ते काम करतात.