एकच आस, रामाचा ध्यास… पहाटे 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत पायी प्रवास… नाशिककर निघाला अयोध्येला
अयोध्येच्या राम मंदिरात जरी श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार असली तरी रामाचा ध्यास अनेकांना आतापासूनच लागलेला आहे. अनेक जण या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती असणार आहे. राम नगरी अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री रामाच्या अभिषेकासाठी देशाच्या अनेक पवित्र नद्यांमधून पाणी आणण्यात आलेले आहे.
जळगाव : पुढील महिन्यात 22 जानेवारीला आयोध्या (Ayodhya) येथे प्रभु श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली आहे. याच उत्सुकतेतून नाशिक येथील 53 वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे गोदावरी नदीतील पाणी असलेला कलश घेवून नाशिक मधील पंचवटी येथून पायी पदयात्रा करत आयोध्याकडे निघाले आहेत. गोदावरीच्या पाण्याने वीरेंद्रसिंह टिळे हे आयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांचा जल अभिषेक करणार आहेत. नाशिक ते आयोध्या असा त्यांचा तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास असणार आहे. रोज पहाटे चार वाजेपासून तर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत ते पायी प्रवास करत आहेत. प्रवासामध्ये त्यांचे ठिकठिकाणी नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
एकच आस, रामाचा ध्यास
अयोध्येच्या राम मंदिरात जरी श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होणार असली तरी रामाचा ध्यास अनेकांना आतापासूनच लागलेला आहे. अनेक जण या सोहळ्यासाठी उत्सुक आहेत. हा सोहळा न भूतो न भविष्यती असणार आहे. राम नगरी अयोध्येमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. श्री रामाच्या अभिषेकासाठी देशाच्या अनेक पवित्र नद्यांमधून पाणी आणण्यात आलेले आहे. नाशिक येथील 53 वर्षीय विरेंद्रसिंह टिळे हे राम भक्त आहेत. रामललाला नाशिकच्या गोदावरी नदीतील पाण्याने जलाभिषेक व्हावा ही तिव्र इच्छा घेऊन ते नाशिक ते अयोध्या असा तब्बल पंधराशे किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करणार आहे.