ब्रम्ह मुहूर्तावर उठण्याचे आहेत अनेक लाभ, यशस्वी लोकं पाळतात हा नियम
हिंदू धर्मात बह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. जर तुम्हालाही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय अवश्य करावे. ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
मुंबई : सनातन धर्मात ब्रह्म मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या दीड तास आधीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त (Bramha Muhurat Benefits) म्हणतात. ज्याला शुभ मुहूर्त असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथ आणि धार्मिक पुराणांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे खूप महत्त्व दिले आहे. ब्रह्म मुहूर्त केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर मानला जात नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्म मुहूर्त हा देवपूजेसाठी अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो. जर तुम्हीही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय लावली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. याशिवाय सनातन धर्मात अशी काही कामे सांगितली आहेत जी ब्रह्म मुहूर्तामध्ये केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळू शकतो.
लक्ष्मीचा लाभतो विशेष आशीर्वाद
ब्रह्म मुहूर्ताची वेळ पहाटे 4 ते पहाटे 5.30 अशी मानली जाते. या शुभ मुहूर्तावर जो उठतो त्याच्यावर माता लक्ष्मीची नेहमी विशेष कृपा असते. ब्रह्म मुहूर्तावर उठून काही विशेष उपाय केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने जीवनात अपार यश मिळते. शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
हे विशेष उपाय ठरतील फायदेशीर
जर तुम्हालाही ब्रह्म मुहूर्तावर उठण्याची सवय असेल तर तुम्ही ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून काही खास उपाय अवश्य करावे. ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्वप्रथम काही मंत्रांचा जप करावा. असे केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते. जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो. म्हणूनच ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी मनात कधीही नकारात्मक भावना आणू नये. अन्यथा, तुम्ही दिवसभर तणावाखाली असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
सकाळी उठल्याबरोबर किंवा ब्रह्म मुहूर्तात अन्न ग्रहण करू नये. आरोग्याच्या दृष्टीने असे करणे शुभ मानले जात नाही. यावेळी जेवल्याने अनेक आजार होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)