किचनला कोणता रंग असायला हवा? काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या
वास्तुशास्त्राचं महत्त्व गेल्या काही दिवसात वाढलं आहे. वास्तु चांगली असेल तर भरभराट होते. त्या पार्श्वभूमीवर वास्तुतील त्रुटी दूर केल्या जातात. यामुळे वास्तुत सकारात्मक उर्जेजा वास होतो अशी मान्यता आहे. चला जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात किचनमध्ये कोणता रंग असावा ते सांगितलं गेलं आहे.
वास्तुशास्त्रात दिशांचा महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण हा मुख्य दिशा आहेत. तर ईशान्य, आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य या उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर (किचन) हे आग्नेय दिशेला असावं. जेणेकरून शेगडी वगैरे या ज्वलनशील वस्तूंसाठी ही दिशा योग्य ठरते. असं सांगितलं जातं की, हृदय जिंकण्याचा रस्ता हा पोटातून जातो. म्हणजे जेवण एकदम चविष्ट असेल तर घरात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. त्यामुळे किचनमधील सर्व वस्तू व्यवस्थित असतील तर सर्वकाही व्यवस्थित होतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रात किचनमध्ये कोणता रंग असावा याबाबतही सांगितलं गेलं आहे. रंगसंगतीचाही आपल्या वास्तुवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. पांढरा रंग शुद्धता आणि स्वच्छतेचं प्रतीक आहे. यामुळे किचनमध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. पांढऱ्या रंगासोबत पिवळा रंगाचंही महत्त्व सांगितलं गेलं आहे.
आग्नेय ही दिशा आगीचं प्रतिक मानली गेली आहे. पिवळा हा रंग मुळातच उष्ण रंग आहे. पिवळ्या रंगाला आनंद आणि उल्हासाचं प्रतीक मानलं गेलं आहे. यामुळे भूख वाढते आणि पचनसंस्था मजबूत होते. त्यामुळे हलका पिवळा रंग किचनला असल्यास लाभ मिळू शकतो. हलका केसरी रंगही तुम्ही किचनला देऊ शकता. पिवळा आणि लाल रंगाचं मिश्रण करून हा रंग तयार होतो. उष्ण रंगाचं प्रतीक आहे. यामुळे स्वयंपाक घरातील कामं करण्यास प्रेरणा मिळते.
तपकिरी रंगही तुम्ही किचनला देऊ शकता. तपकिरी रंगही सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. स्वयंपाकघराची नाळ जमिनीशी जोडते आणि सुरक्षित वातावरण तयार करते. दुसरीकडे, किचनला गडद रंग वापरणं टाळावं. गडद तपकिरी रंगही देऊ नये. कारण गडद रंग हे नकारात्मक ऊर्जा वाढवतात. त्याचा कुटुंबाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे किचनमध्ये कायम स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. उष्टी भांडी सिंकमध्ये तशीच ठेवू नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)