स्टीव्ह जॉब्स यांनी 50 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यावर पत्रात काय लिहीलं होतं, पत्राचा किती कोटींना लिलाव?

Steve Jobs Letter: स्टीव्ह जॉब्स यांनी स्वत:च्या १९ व्या जन्मदिवसानिमित्त आपल्या बालपणीच्या मित्राला पत्र लिहीले होते. या पत्रात त्यांनी कुंभ मेळ्याबद्दल लिहीले होते.

स्टीव्ह जॉब्स यांनी 50 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यावर पत्रात काय लिहीलं होतं, पत्राचा किती कोटींना लिलाव?
Steve Jobs Letter
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 5:23 PM

Maha Kumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ-२०२५ मध्ये भक्तांचा मेळा भरला आहे. महाकुंभच्या पहिल्या शाही स्नानाला मंगळवारी ३.५ कोटी भाविकांना संगमात आस्थेने डुबकी मारत स्नान केले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एप्पलचे दिवंगत सह सस्थापक स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवले जॉब्ल देखील पोहचल्या आहे. या दरम्यान, त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांनी साल १९७४ मध्ये पन्नास वर्षांपूर्वी लिहीलेले पत्र सध्या चर्चेत आहे. या पत्राला लिलावात ४.३२ कोटी रुपये मिळाले आहेत.

अॅप्पलचे सह संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांनी कुंभ मेळ्यासंदर्भात एक पत्र साल १९७४ रोजी लिहिले होते. त्यांनी आपल्या १९ व्या जन्मदिवसाच्या ठीक आधी हे पत्र लिहिले आहेत. हाताने लिहिलेल्या या पत्रात स्टीव्ह जॉब्सन यांनी भारत आणि भारताच्या अध्यात्मिक वातावरणाबद्दलचा आपला रस दाखविला आहे. त्यांनी आपल्या भावना या पत्राद्वारे लिहीत भारत भरणाऱ्या कुंभ मेळ्या बाबतची आपल्या योजनेबद्दल लिहीले होते.स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या बालपणीचा मित्र टीम ब्राऊन यांना पत्र पाठविले आहे.

स्टीव्ह जॉब्स यांनी लिहीलेल्या ५० वर्षे जुन्या पत्राचा लिलाव करण्यात आला आहे. या पत्रासाठी सर्वाधिक बोली लावण्यासाठी मोठी स्पर्धा होती. लिलाव केले गेलेले पत्र स्टीव्ह जॉब्स यांनी लिहीलेले पहिले पत्र आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्या एका व्यक्तीने ५००,३१२.५० डॉलरची ( ४.३२ कोटी रुपये ) रुपये देऊन हे पत्र विकत घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

स्टीव्ह जॉब्स यांनी काय लिहीले होते?

या पत्रात स्टीव्ह जॉब्स लिहीतात की , मी एप्रिलमध्ये भारतात सुरु होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी भारतात जाऊ इच्छीत आहेत. मी मार्च महिन्यात कोणत्याही वेळी येऊ शकतो. हे अजून निश्चित झालेले नाही. ..’ या आपल्या पत्राचा शेवट त्यांनी ‘शांती’ या शब्दाने केला आहे.हे पत्र त्यांचं हिंदू धर्माबद्दलचे प्रेम दर्शवत आहे. त्यांनी भारतातील आपल्या संभाव्य दौऱ्या सह येथील संस्कृती आणि शिक्षणासंदर्भात देखील लिहीले आहे.

साल १९७४ मध्ये त्यांनी भारताचा प्रवास केला होता.याची सुरुवात त्यांनी उत्तराखंड येथून केली होती. नीम करोली बाबा यांच्या आश्रमात जाण्याची योजना त्यांनी केली होती. आणि कैंची धाम येथे ते राहीले होते. भारतात सात महिने राहून भारतीय संस्कृतीला जाणले होते.

४० सदस्यांच्या टीमसह लॉरेन जॉब्स आल्या…

प्रयागराज येथील महाकुंभ २०२५ मेळाव्यात एप्पलचे को-फाऊंडर दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स देखील पोहचल्या आहे. लॉरेन जॉब्स आपल्या पतीच्या इच्छेने प्रेरणा घेऊन येथे आल्या आहेत. त्यांनी त्यांचे गुरु मार्गदर्शक स्वामी कैलाशानंद गिरी यांनी लॉरेन यांचे नाव कमला असे नामकरण केले आहे. लॉरेन ४० सदस्यांच्या टीम सोबत ध्यानधारणा करीत आहेत.

40 सदस्यीय टीम के साथ कुंभ पहुंची ‘कमला’

प्रयागराज में आयोजित हो रहा Mahakumbh 2025 में ऐपल को-फाउंडर स्‍टीव जॉब्‍स की पत्‍नी लॉरेन पॉवेल जॉब्स भी पहुंची हैं. लॉरेन पॉवेल जॉब्स की ये यात्रा अपने पति की इच्छाओं से प्रेरित हो सकती है. अपने आध्यात्मिक मार्गदर्शक स्वामी कैलाशानंद गिरि द्वारा ‘कमला’ के नाम से जानी जाने वाली लॉरेन 40 सदस्यों की टीम के साथ ध्यान, योग और प्राणायाम कर रही हैं.

महाकुंभ – २०२५ ची सुरुवात

१३ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळाव्यात ५ कोटी १५ लाखहून अधिक भाविक आणि साधू संतांनी पवित्र संगमात शाही स्नान केले आहे. या सोहळा २६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.या महाकुंभ मेळाव्यात ४० कोटी श्रद्धाळू सहभागी होणार आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.