ग्रहण नेमकं काय असतं? या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या

What exactly is an eclipse : ग्रहण हा शब्दच अत्यंत वाईट मानला जातो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्हींबाबत हिंदू धर्मात अनेक अंधश्रद्धा आहेत. एखादी गोष्ट होत नसेल तर आपसूकच प्रत्येकाच्या तोंडून ग्रहण लागलं की काय? असं येतं. मात्र ग्रहण लागतं म्हणजे काय होतं सर्व काही अगदी सोप्या शब्दात जाणून घ्या.

ग्रहण नेमकं काय असतं? या काळात काय करावं काय नाही? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 5:23 PM

आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये ग्रहणाविषयी वाचलं असेल. ग्रहण लागणार आहे, त्याआधी सर्वत्र जोरदार चर्चा असते. नवीन वर्षामध्ये किती ग्रहण असणार आहेत आणि कधी याविषयी अनेकजण माहित करून घेण्यासाठी उत्सुक असताात. नेमकं ग्रहण म्हणजे काय असतं? ग्रहणाचे प्रकार त्यासोबतच ग्रहण काळात काय करू नये? ग्रहणाविषयी सर्वकाही जाणून घ्या.

सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण यामधील फरक?

सूर्य, पृथ्वी आणि त्यांच्या मध्ये चंद्र एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्रामागे सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्यग्रहण लागलं असं बोललं जातं. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जगात दरवर्षी दोन ते पाच सूर्यग्रहण होऊ शकतात. संपूर्ण ग्रहण दर 18 महिन्यांमध्ये एकदाच होते. रॉयल म्युझियम्स ग्रीनविचच्या म्हणण्यानुसार, एकदा पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी संपूर्ण सूर्यग्रहण दिसले की, त्या भागाला पुढील सूर्यग्रहण पाहण्यासाठी सुमारे 400 वर्षे लागतील.

सूर्यग्रहणाचे प्रकार किती आणि कोणते?

सूर्यग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती असे तीन प्रकार पडतात. यामधील कोणतं सूर्यग्रहण आहे ठरवताना सूर्य, चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर किती आहे? त्यासोबतच सूर्य, चंद्र आणि पृथ्वी सरळ रेषेमध्ये आहेत का यावरून या ग्रहणाचा प्रकार ठरवला जातो.  आपण पृथ्वीवरून सूर्यग्रहण पाहतो तेव्हा सूर्य पूर्णपणे झाकला गेला असेल तर खग्रास सूर्यग्रहण लागलं असं म्हणतात. जर सूर्याचा काही भाग झाकलेल्या अवस्थेत दिसत असेल तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जातं.

चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीपेक्षा लहान आहे, पृथ्वीपासून चंद्र जवळ असल्याने चंद्र आणि सूर्य आकाराने आपल्याला एकसारखेच दिसतात त्यामुळे खग्रास स्थितीमध्ये चंद्राचं बिंब सूर्याला पूर्ण झाकू शकतं. परंतु पृथ्वीच्या काही कक्षा लंबागोलाकार आहेत. चंद्र या कक्षेमध्ये पृथ्वीपासून लांबच्या बिंदूजवळ जातो तेव्हा पृथ्वीवरून चंद्राचा आकार सूर्यापेक्षा आपल्याला बारिक दिसतो. या स्थितीमध्ये सूर्यग्रहण सुरू असेल तेव्हा चंद्र सूर्याच्या मधोमध येतो खरा पण त्याच्यामागे सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि एखाद्या बांगडीसारखी सूर्याची कडा दिसते तेव्हा त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण लागलं असं म्हणतात.

चंद्रग्रहणाचे प्रकार किती आणि कोणते?

पृथ्वी स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आल्यावर होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण मानलं जातं. चंद्रग्रहणाचेही खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे तीन प्रकार पडतात. चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे जेव्हा एकाच रेषेमध्ये येतात त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात. यावेळी पृथ्वीची संपूर्ण सावली चंद्रावर पडते मात्र त्यासोबतच सूर्याचा काही उजेड चंद्रावर पडतो त्यामुळे चंद्र हा लालसर दिसू लागतो. या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण आणि ‘ब्लड मून’ असंही म्हटलं जातं.

जेव्हा पृथ्वीमुळे चंद्राच्या काही भागावर सावली पडते त्यावेळी त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. पृथ्वीची सावली किती प्रमाणात पडली आहे त्यावरून चंद्रावर लालसर किंवा चॉकलेटी रंगछटा दिसून येतात.  खग्रास चंद्रग्रहण हे दोन वर्षामधून एकदातर खंडग्रास चंद्रग्रहण हे वर्षातून दोनदा पाहायला मिळतं. सूर्यग्रहण हे आपल्याला पृथ्वीच्या काही भागावरून पाहायला मिळतं. तर चंद्रग्रहण हे जवळपास संपूर्ण जगभरामधून दिसू शकतं.

पृथ्वीच्या गडद सावलीमधून चंद्राचा प्रवास होतो तेव्हा उपछाया चंद्रग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि त्याची सावली संपूर्ण पृथ्वीवर पडलेली असते त्याला छायाकल्प चंद्रग्रहण असं म्हटलं जातं. हे चंद्रग्रहण जास्त प्रभावी नसल्याने ते छोट्या स्वरूपाचं ग्रहण असतं. महत्त्वाचं म्हणजे काहीवेळा या चंद्रग्रहणांची कॅलेंडरमध्येही नोंद पाहायला मिळत नाही. त्यासोबतच आपल्याला काहीवेळा ते लवकर लक्षातही येत नाही.

ग्रहण पाहताना काय खबरदारी घ्यावी?

ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे त्यामुळे कोणताही अपाय होत नाही. मात्र ते पाहताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ‘सोलर फिल्टर’ लावलेले चष्मे ग्रहन पाहताना वापरावेत. सूर्यग्रहणावेळी असा चष्मा असेल तरीसुद्धा जास्तवेळ सूर्याकडे पाहू नये. गहू चाळताना जी चाळण वापरली जाते त्याच्या मदतीनेसुद्धा तुम्ही ग्रहण पाहू शकता. कमी वयात मोतीबिंदू किंवा तात्पुरतं अंधत्त्व येण्याचा धोकाही डोळे उघडे ठेवून सूर्यग्रहण पाहताना असतो.

ग्रहणामध्ये काय करावं आणि काय नाही?

ग्रहणमाध्ये काय करावं आणि काय नाही करावं याबाबत सोशल मीडिया, युट्यूबर अनेकजण दिले देतात. या अंधश्रद्धा आहे की यामध्ये खरंच काही सत्य आहे जाणून घ्या. ग्रहणकाळामध्ये अनेक ठिकाणी घरात स्वयंपाक केला जात नाही. गर्भवती महिलांना घराबाहेर पडू दिलं जात नाही. ग्रहणामध्ये बाळाचा ओठ आणि टाळू फाटला जातो असा समज आहे. ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा बाहेर जास्त प्रमाणात असते. काही ठिकाणी तर घरांमध्ये पार्टनर शारीरिक संबंधसुद्धा ठेवणं टाळतात.

ग्रहणकाळामध्ये जेवणही करू शकता त्यासोबतच गर्भवती महिलांनीही बाहेर पडल्याने काही त्रास होत नाही. ग्रहण हे भारतातच नाही होत, या काळात जगभरातील लोक हे बाहेर पडतात त्यामुळे याचा बाळावरही काही परिणाम होत नाही. ग्रहणावेळी काही लोक आपल्या घरातील अन्न आणि पाणी हे सर्व दूषित होतं त्यामुळे ग्रहण संपल्यावर सर्व पाणी फेकून देतात आणि नवीन पाणी भरतात त्यानंतर स्नान करून करतात. ग्रहणाचा परिणाम राशीवरही होतो असं समज करून त्यामुळे अनेकजण आपल्याला काही त्रास नाही ना होणार याबाबतची चौकशी करताना पाहायला मिळतात.

ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडल्याने अनर्थ होईल, अशी अंधश्रद्धा मानणारे आजही अनेक लोक आहेत. काही ठिकाणी मंदिराची दारे बंद करण्यात येतात. ग्रहण संपल्यावर देव-देवतांच्या मूर्तींचा अभिषेक करतात. अशा अनेक अंधश्रद्धा अजुनही त्या मानल्या जातात. परंतु  तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामधील सर्व गोष्टी करू शकता त्यावर ग्रहणाचा काही परिणाम होत नाही. कोणत्याही अंधश्रद्धांना बळी पडू नका.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.