मुंबई : दक्षिण भारतात पोंगल (Pongal) या सणाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी हा सण 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीपासून (Makar sankaranti) सूरु होणार आहे. 4 दिवस चालणारा हा सण 17 जानेवारीला संपेल. दक्षिण भारतातील लोक नवीन वर्ष म्हणून पोंगल सणही साजरा करतात. मान्यतेनुसार, या दिवशी लोक घरातील जुने सामान काढून टाकतात आणि घरे विशेषतः रांगोळी इत्यादींनी सजवतात.
पोंगलचा मुहूर्त आणि अर्थ
पोंगलचा शुभ काळ
पोंगल पूजेचा शुभ मुहूर्त १४ जानेवारी रोजी दुपारी २.१२ वाजता आहे.
पोंगलचे महत्त्व
दक्षिण भारतातील हा सण समृद्धीसाठी समर्पित असल्याचे म्हटले जाते. या दिवशी धानाचे पीक गोळा करून, येणारे पीकही चांगले येवो, अशी देवाकडे प्रार्थना करूनच आनंद व्यक्त करून हा सण साजरा केला जातो. पाऊस, सूर्यदेव, इंद्रदेव आणि पशु (प्राणी) यांची पूजा या सणात समृद्धी आणण्यासाठी केली जाते.
पोंगल म्हणजे काय
असे मानले जाते की पोंगल सणाच्या आधी अमावस्या येते तेव्हा प्रत्येकजण वाईटाचा त्याग करून चांगले अंगीकारण्याचे व्रत घेतो, ज्याला ‘पोही’ असेही म्हणतात. पोही म्हणजे ‘जाणे’, याशिवाय तमिळ भाषेत पोंगल म्हणजे उफान असा होतो.
असा साजरा करा पोंगल
पोंगल चार दिवस साजरे केला जातो, या दिवशी सर्व प्रकारचा कचरा जाळला जातो. सणासुदीला चांगले पदार्थ तयार केले जातात. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, तिसऱ्या दिवशी गुरांची पूजा केली जाते आणि चौथ्या दिवशी कालीजीची पूजा केली जाते. सणाच्या दिवशी घरांची खास साफसफाई करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधीत बातम्या :
Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका