Varuthini Ekadashi 2022 | वरुथिनी एकादशी म्हणजे नक्की काय? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, पूजा मुहूर्त
वैशाख (Viashakh) महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते. यंदा ही एकादशी शनिवार, 26 एप्रिल रोजी येत आहे.
मुंबई : वैशाख (Viashakh) महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते. यंदा ही एकादशी शनिवार, 26 एप्रिल रोजी येत आहे. भगवान विष्णूचा आशीर्वाद घेण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते. भगवान श्रीकृष्णांनी (Shri krushna) युधिष्ठिराला वरुथिनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते, त्यानुसार जो कोणी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्याला स्वर्ग प्राप्त होतो अशी मान्याता आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत.प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून २४ एकादश्या येतात. शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे.
वरुथिनी एकादशी 2022 तिथी
पंचांग नुसार, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी शनिवार, 26 एप्रिल रोजी सकाळी 01:37 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 27 एप्रिल रोजी सकाळी 12:47 वाजता संपेल.
वरुथिनी एकादशी 2022 मुहूर्त
या दिवशी संध्याकाळी 07.06 पर्यंत ब्रह्मयोग आहे, त्यानंतर इंद्र योग सुरू होईल. शतभिषा नक्षत्र दुपारी 04:56 पर्यंत आहे, त्यानंतर पूर्व भाद्रपद होईल. हे दोन्ही योग आणि नक्षत्र शुभ कार्यासाठी शुभ आहेत. वरुथिनी एकादशीच्या दिवशी पहाटेपासून भगवान विष्णूची पूजा करू शकता. त्रिपुष्कर योग वरुथिनी एकादशीच्या दिवशी सकाळी 12:47 उशिरा ते दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल रोजी पहाटे 05:44 पर्यंत आहे. या दिवसाचा अभिजित मुहूर्त सकाळी 11.53 ते दुपारी 12.45 पर्यंत आहे.
वरुथिनी एकादशी पूजा पद्धत
सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्नानानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा. विष्णूच्या मूर्तीला स्नान घालावे. नियमानुसार भगवान विष्णूची पूजा करा. देवाची पूजा करा. वरुथिनी एकादशीला भगवान विष्णूला अन्न अर्पण करा. द्वादशीच्या दिवशी विधिपूर्वक उपवास सोडावा. शक्य असल्यास या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा
वरूथिनी एकादशीच्या दिवशी उपवास करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच व्रत कथा पाठ करणे किंवा श्रवण करणेही महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूची पूजा करताना वरुथिनी एकादशी व्रताची कथा वाचा. काही कारणाने वाचता येत नसेल तर ऐका.
संदर्भ : मराठी विश्वकोष
संबंधीत बातम्या
Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता
Jyotish tips: सुख म्हणजे नक्की काय असतं?, चार गोष्टी टाळल्या की ते घर बसल्या मिळतं!
केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!