आज उत्पत्ती एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे. जे भगवान विष्णूला समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होते आणि चुकून झालेली पापे नष्ट होतात.

आज उत्पत्ती एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:12 AM

उत्पत्ती एकादशीचा दिवस भगवान श्री विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. उत्पत्ती एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते आणि यावर्षी ती 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी एकादशीचा या दिवशी जन्म झाला. देवी एकादशी पापांचा नाश करणारी आणि भक्तांना मोक्ष देणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूला तुळस अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. पंचांगानुसार यावर्षी उत्पत्ती एकादशीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये प्रीती योग आणि आयुष्यमान योग प्रमुख आहेत. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि सुख नांदते.

कधी आहे उत्पत्ती एकादशी?

मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.०१ मिनिटांनी सुरू होईल आणि २७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:४७ वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला दुपारी एक १:१२ ते ३: १८ पर्यंत एकादशीचा उपवास सोडता येणार आहे.

पूजेचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार उत्पत्ती एकादशीच्या पूजेची वेळ २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११: ४७ ते दुपारी १२: २९ पर्यंत असेल. या शुभ योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्याने शुभ फळ प्राप्त होईल.

उत्पत्ती एकादशीचे पारणे

उत्पत्ति एकादशी व्रताच्या पारण्याची वेळ दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबर रोजी द्वादशी तिथीला आहे. पारणे करण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी १:१२ ते ३:१८ पर्यंत असेल. पारणे करण्यापूर्वी भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि नंतर पारणे करावे.

पूजा विधी

उत्पत्ती एकादशीची पूजा करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर पंचामृत आणि गंगाजलने त्यांना अभिषेक करून तुपाचा दिवा लावावा. “ओम नमो नारायण” या मंत्राचा जप करून भगवान विष्णूला सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई आणि चंदन अर्पण करा. शेवटी आरती करून देवाला मनोभावे नमस्कार करा.

उत्पत्ती एकादशीचे महत्त्व

मान्यतेनुसार ही एकादशी केल्याने माणसाची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख, शांती नांदते. हे व्रत केवळ पापांपासून मुक्त करत नाही तर जीवनात आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक शांती देखील प्रदान करते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.