कठीण परिस्थितीत योग्य निर्णय शांत मनचं घेऊ शकतं; माहिती करून घ्या यासंबंधातील 5 महत्त्वाच्या गोष्टी
मनात राग असेल तर आपल्यालाचं त्याचं नुकसान होतं. मनात राग असताना कोणताही निर्णय घेऊ नका. यासाठी काय करता येईल ते जाणून घ्या.
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर मन शांत राहणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीत धैर्य आणि शांतीने मनातील प्रश्न सोडवले जातात. असं म्हटलं जातं की, मनापेक्षा चंचल काही नसते. कोणत्या ना कोणत्यातरी गोष्टीवरून मनात उत्सुकता असते. कित्तेक महापुरुषांचं म्हणण आहे की, ज्यानं मनाला नियंत्रित केलं तो यशस्वी होतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून व्यक्ती विचलीत होत असतो. कठीण परिस्थितीत व्यक्तीचे मनावरील नियंत्रण सुटते. मनात राग निर्माण होतो. यामुळं आपलचं नुकसान होतं.
मनात राग असेल तर आपल्यालाचं त्याचं नुकसान होतं. मनात राग असताना कोणताही निर्णय घेऊ नका. यासाठी काय करता येईल ते जाणून घ्या.
- समोरील व्यक्तीचे वय आणि बुद्धीवरून मनाचा पत्ता लावता येत नाही. मनाचा ठाव फक्त प्रेम आणि सहानुभूतीने घेता येतो.
- तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर जे तुम्हाला खूश ठेवतात त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांची सोबत तुम्हाला प्रभावित करू शकते.
- हरलेला खेळ दुसऱ्यांदा खेळता येतो. पण, मन एकदा हरलं तर ते परत जिंकवणं कठीण असतं.
- यशाचा मार्ग हा मनातील विचारातून जातो. मनाला जिंकलात तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही.
- मन अस्थिर आणि चंचल असेल, तर चांगले गुरु किंवा साधूंचा सत्संगसुद्धा मनावर प्रभाव टाकू शकत नाही.