मुंबई : पंचांगानुसार 18 जानेवारीपासून माघ महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. माघ महिन्यात स्नान, दान आणि उपासनेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊयात माघ महिन्याचे महत्त्व.
माघ महिन्याचे महत्त्व
भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. या महिन्यात कल्पवास केला जातो. माघ महिन्यात युधिष्ठिराने महाभारत युद्धात वीरगती प्राप्त केलेल्या आपल्या नातेवाईकांना मोक्ष मिळवून देण्यासाठी कल्पवास केला होता. 16 फेब्रुवारी 2022 रोजी माघ महिना संपेल.
निरोगी राहण्यासाठी
माघ महिन्यात सूर्यदेवाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. ही ऊर्जा अनेक प्रकारच्या आजारांपासूनही बचाव करते.
2022 माघ अमावस्या कधी आहे?
माघ महिन्यातील अमावस्या 01 फेब्रुवारी 2022 आहे, मंगळवारी येते. याला मौनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी स्नान करून दान करण्याची आणि मौनव्रत ठेवण्याची परंपरा आहे. पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध केले जाते.
2022 माघ पौर्णिमा कधी आहे?
पंचांगानुसार 16 फेब्रुवारी 2022 ही बुधवारी पौर्णिमा आहे. याला माघ पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी व्रत, स्नान आणि श्री सत्यनारायणाचे पठण करणे अत्यंत शुभ फल देणारे मानले जाते.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती
Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व