Chhath Puja: कधी आहे छट पूजा, पूजेचा मुहूर्त आणि विधी

उत्तर भारतीयांमध्ये महत्त्वाचा सण मानला जाणारा छठ पूजा 28 तारखेला सुरु होणार आहे. पूजेसाठी मुहूर्त आणि विधी काय असेल जाणून घेऊया.

Chhath Puja: कधी आहे छट पूजा, पूजेचा मुहूर्त आणि विधी
छट पूजा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 2:33 PM

मुंबई, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ पूजेचा (Chhath Puja) सण साजरा केला जातो. यावेळी 28 ऑक्टोबरपासून छठचा सण सुरू होऊन 31 ऑक्टोबरला संपणार आहे. छठ पूजेच्या दिवशी सूर्यदेव आणि षष्ठी मैया यांची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी महादेवाचीदेखील पूजा केली जाते. हा उत्सव बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक साजरा केला जातो. यासोबतच नेपाळमध्येही हा सण साजरा केला जातो. या सणाला सूर्य षष्ठी असेही म्हणतात. छठपूजेचा सण मुलांसाठी ठेवला आहे. हे 36 तासांचे निर्जला व्रत पाळले जाते.

किती दिवस ठेवला जातो  छठ पूजेचा उपवास

  1.  ज्या दिवशी छट पुजलेला सुरवात होते त्या दिवसाला ‘नहे खा’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी उपवास करण्यापूर्वी एकदाच जेवण करावे लागते. त्यानंतर नदीत स्नान करावे लागते. 28 ऑक्टोबर रोजी नाहय खय आहे.
  2. छठच्या दुसऱ्या दिवसाला खरना म्हणतात. या दिवशी महिला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. संध्याकाळी, सूर्यास्तानंतर लगेचच, उपवास मोडला जातो. त्यानंतर अन्न तयार केले जाते. त्यानंतर सूर्याला नैवैद्य अर्पण केला जातो. व्रताचा तिसरा दिवस दुसऱ्या दिवसाच्या नैवेद्यानंतर लगेच सुरू होतो. 29 ऑक्टोबर रोजी खरना आहे.
  3. छठ पूजेचा तिसरा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. यानिमित्ताने सायंकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची परंपरा असून बांबूच्या टोपल्यांमध्ये फळे, थेकुआ, तांदळाचे लाडू आदींनी अर्घ्य सजवले जाते. यानंतर उपवास करून आपल्या कुटुंबासह सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि या दिवशी मावळत्या सूर्याची पूजा केली जाते. पहिला अर्घ्य ३० ऑक्टोबरला आहे. या दिवशी सूर्यास्ताची वेळ 05:37 मिनिटे असेल.
  4. चौथा दिवस – उषा अर्घ्य हे अर्घ्य उगवत्या सूर्याला अर्पण केले जाते. त्याला उषा अर्घ्य म्हणतात. हे अर्घ्य 36 तास उपवास केल्यानंतर दिले जाते. 31 ऑक्टोबर रोजी छठचा शेवटचा दिवस असेल. या दिवशी सूर्योदयाची वेळ 06.31 मिनिटे असेल.

छठ पूजेच्या दिवशी या गोष्टी ठेवा लक्षात

या दिवशी गरजू आणि गरीब लोकांना मदत केली पाहिजे. छठपूजेचा नैवेद्य करताना खारट वस्तूंना हात लावू नये. स्टील, प्लॅस्टिक, काच, चांदी इत्यादी वस्तूंनी सूर्याला अर्घ्य देऊ नये. या दिवशी गरिबांमध्ये अन्न वाटप केल्यास छठ माता सर्व इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक मान्यता आहे.

छठच्या दिवशी काय करावे

ज्या लोकांना संतती हवी आहे, त्यांनी छठच्या दिवशी ‘ओम ह्रीं ह्रीं ह्रौंस: सूर्याय नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

हे सुद्धा वाचा

ज्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा घरात आर्थिक समस्या येत आहेत, त्यांनी या दिवशी सूर्यदेव “ओम घृनिः सूर्याय नमः” या मंत्राचा जप करावा.

मुलांच्या सुख-समृद्धीसाठी या दिवशी भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे आणि पशु-पक्ष्यांना गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवलेले पदार्थ खायला द्यावेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.