घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश झाला की असे मिळतात संकेत! जाणून घ्या पाच लक्षणं

घरात कायम सकारात्मक उर्जेचा वास राहावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. यासाठी घरात पूजापाठ केले जाते. पण इतकं करूनही कधी कधी घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो. पण आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखावं. याबाबत वास्तुशास्त्रात काही संकेत सांगितले गेले आहेत.

घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश झाला की असे मिळतात संकेत! जाणून घ्या पाच लक्षणं
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 6:15 PM

वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती राहावी यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत. त्यामुळे घरात सुख शांती राहावी यात वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते. जर घरात नकारात्मक उर्जेचा वास असेल तर प्रत्येक काम अर्धवट राहतं. त्यामुळे अनेकदा भांडणं होतात. तसेच घरातील शांतता भंग पावते. त्यामुळे घरात कायम सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रयत्न केले जातात. पण आपल्या घरात नकारात्मक उर्जेचा वास आहे की नाही कसं ओळखता येईल. वास्तुशास्त्रात याबाबत काही सांगितलं गेलं आहे की नाही, असे अनेक प्रश्न विचारले जातात. जर तुमच्या वास्तुत नकारात्मक उर्जेचा वास असेल तर हे पाच संकेत तुम्हाला मिळतात. तुमच्या घरात अशी लक्षणं तर नाहीत नाही ना.. जर अशी काय लक्षणं असतील तर ती ओळखा आणि वास्तुनुसार उपाय करून ती दूर करा.

घरात येताच मन खिन्न होतं : सर्वात पहिलं लक्षण म्हणजे घरात येताच मनात विचित्र विचार येण्यास सुरुवात होते. कायम नकारात्मक विचार मनात येतात. घरात बसण्याचं मन करत नाही. कायम आर्थिक खराब होईल याची भीती सतावत राहते.

कुटुंबात कायम कोणी ना कोणी आजारी पडतं : ज्या वास्तुत नकारात्मक उर्जेचा वास असतो अशा घरात माणसं ठरावीक कालावधीनंतर आजारी पडत असतात. वारंवार उपचार करूनही आजारपण काही दूर होत नाही. त्यामुळे अशा घरात स्वच्छता ठेवावी. तसेच हवन करून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिपडावं.

घरात कोणता ना कोणता अपघात होत राहणं : घरात वावरताना काळजी घेऊनही अनेकदा काही ना काही अपघात होत असतात. कोण पडतं, तर कोणाला जखम होते, हे सर्व संकेत वास्तुदोषाशी निगडीत असतात. अशा स्थितीत घरात पूजाविधी करावा आणि नामस्मरण करत राहावं.

घरात कोणाचा तरी वास असल्याची जाणीव : घरात अनेकदा कोणीतरी आपल्याला लपून बघत असल्याची जाणीव होणं वास्तुदोष दर्शवते. अर्थात घरात नकारात्मक उर्जेचा वास असल्याचा संकेत आहे. चालण्याचा आवाज येणे, किंवा काहीतरी खाण्याचा आवाजामुळे दचकून जागं होणे हे सर्व नकारात्मक उर्जेचे संकेत आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे : घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होत असतील किंवा वीज वारंवार जात असेल तर घरात नकारात्मक उर्जेचा वास असतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. अशावेळी घरात मंगळ यज्ञ करावा आणि गंगाजल शिंपडावं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोत आणि प्रचलित अख्यायिकांवरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.