भाऊबीज 3 की 4 तारखेला? गोंधळायची गरजच नाही… ही आहे खरी तारीख; पूजा अणि शुभ मुहूर्तही जाणून घ्या

भाऊबीजेचा हा सण बहीण भावांचं अतूट नातं आणि प्रेमाचं प्रतिक आहे. हिंदू धर्मात या सणाचं अनन्यसाधारण महत्त्व असून, मोठ्या उत्साहात सर्वत्र भाऊबीज साजरा केली जाते.

भाऊबीज 3 की 4 तारखेला? गोंधळायची गरजच नाही... ही आहे खरी तारीख; पूजा अणि शुभ मुहूर्तही जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 7:59 PM

भाऊबीजेचा हा सण बहीण भावांचं अतूट नातं आणि प्रेमाचं प्रतिक आहे. हिंदू धर्मात या सणाचं अनन्यसाधारण महत्त्व असून, मोठ्या उत्साहात सर्वत्र भाऊबीज साजरा केली जाते. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्त पक्षाच्या द्वितीयेला भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो. भाऊबीजेला यम द्वितीया असं देखील म्हटलं जातं. मात्र यावेळी दिवाळी दोन दिवस आल्यानं भाऊबीजेच्या तारखेबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भाऊबीजेची तारीख, पुजेचा मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भाऊबीज कोणत्या दिवशी?

हिंदू पंचांगानुसार यंदा कार्तिक महिन्याच्या शुक्त पक्षाच्या द्वितीया या तिथीला 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 आठवाजून 22 मिनिटांनी सुरुवात होते, आणि या तिथीची समाप्ती 3 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 6 मिनिटांनी होते. त्यामुळे उद्याच म्हणजे तीन तारखेला सर्वत्र भाऊबीज हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते.

पुजेसाठी शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार उद्या सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. या काळात तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण करू शकता. त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकता. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी शुभ मुहूर्तावर जर बहिणीने भावासाठी प्रार्थना केली तर भावाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते. तसेच त्याच्या घरी सुख समृद्धी येते.

औक्षणाचा विधी

भाऊबीजेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर बहीण भावाचं औक्षण करते. आधी त्याला कुंकवाचा टिळा लावते. त्यानंतर त्याचं औक्षण करते. औक्षणानंतर त्याला काही तरी गोड पदार्थ खाण्यासाठी देते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊबीजेचा हा सण बहीण भावांचं अतूट नातं आणि प्रेमाचं प्रतिक म्हणून साजरा करण्यात येतो. देशभरात मोठ्या उत्साहात भाऊबीज साजरी केली जाते. यावर्षी उद्या म्हणजेच तीन नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार  आहे.

Non Stop LIVE Update
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले
'राज ठाकरेंनी चर्चेविना उमेदवार उभे केले म्हणून...',शिंदे स्पष्ट बोलले.
'पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे...'- शरद पवार
'पोलिसांच्या वाहनातून सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैसे...'- शरद पवार.
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.