मुंबई : हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. पुरांनुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात 2022 मध्ये सूर्यग्रहण कधी होणार आहे .
2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील. मात्र, भारतातील हे पहिले सूर्यग्रहण अर्धवट असेल. हे सूर्यग्रहण दक्षिण आणि पश्चिम अमेरिका, पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये पाहता येणार आहे.
2022 सालचे दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. हे दुसरे ग्रहण शनिवार 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, 2022 चे हे दुसरे सूर्यग्रहण संध्याकाळी 04:29 ते 05.42 पर्यंत होईल. दुसरे सूर्यग्रहण देखील आंशिक असेल. हे ग्रहण भारतातही दिसणार नाही. हे आंशिक सूर्यग्रहण युरोप, दक्षिण आणि पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिकामध्ये पाहता येईल.
1. सूर्यग्रहणाच्या दिवशी सुतक काळात काहीही खाऊ नये. मान्यता आहे की याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
2. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करु नये. त्याने देवाच्या मूर्ती दुषित होतात.
3. सूर्यग्रहणावेळी सूर्याला थेट डोळ्यांनी पाहू नये. हे आपल्या डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकते.
4. सूर्यग्रहण सुरु असताना गर्भवती महिलांनी काहीही खाऊ-पिऊ नये. याशिवाय सुई-धागाही वापरु नये.
Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा