Solar Eclipse | 30 एप्रिलला होणार या वर्षातले पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची इत्थंभूत माहिती

 हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे.

Solar Eclipse | 30 एप्रिलला होणार या वर्षातले पहिले सूर्यग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची इत्थंभूत माहिती
solar eclipse
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 7:00 AM

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2022) विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण एक महत्त्वाची घटना आहे. आकाशात घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो. पुराणानुसार सूर्यग्रहणाच्या काळात कोणते ही शुभ कार्य केले जात नाही.दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही ग्रहण होणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान येतो. ही चंद्र (Moon) व सूर्य यांची युती असते. अनुकूल परिस्थितीत चंद्र, सूर्य व पृथ्वी या तिन्ही गोलांचे मध्यबिंदू कधीकधी एका रेषेत येतात. अशा वेळी चंद्र आड आल्यामुळे पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य काहीसा किंवा संपूर्ण दिसेनासा होतो. या आविष्काराला सूर्यग्रहण म्हणतात. 2022 मध्ये एप्रिल महिन्यात पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल, शनिवारी होणार असून. भारतीय वेळेनुसार, 30 एप्रिल रोजी होणारे हे सूर्यग्रहण दुपारी 12:15 ते संध्याकाळी 04:07 पर्यंत राहील.

ग्रहण काळात काय करावे

तुळशीची पाने अन्न आणि पाण्यात टाका, जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्यावर पडू नये आणि ग्रहणानंतर त्यांचे सेवन करता येईल. घराचे मंदिर झाकून ठेवा. यादरम्यान मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवले जातात. ग्रहणकाळात जास्तीत जास्त वेळ देवपूजेत घालवावा. ग्रहणानंतर स्नान करून दान करावे. विशेषत: तसेच या काळात दान करणे देखील शुभ मानले जाते.

ग्रहण काळात हे काम करू नका

ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये. ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे. सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका. विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये. ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.

सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका सूर्यग्रहण काळात पचनशक्ती कमजोर होते, त्यामुळे सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये. ग्रहणाच्या वेळी स्वतःचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या सावलीपासून संरक्षण केले पाहिजे. याशिवाय उपासना टाळा आणि मनात फक्त देवाचे स्मरण करा.

सूर्यग्रहण कुठे होईल? सूर्यग्रहण शनिवार, 30 एप्रिल रोजी दुपारी 12:15 वाजता सुरू होईल आणि रविवार, 1 मे रोजी पहाटे 04:07 पर्यंत राहील. हे सूर्यग्रहण भारतात नसून अटलांटिक, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण-पश्चिम भाग आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.

संंबंधीत बातम्या

Vastu Tips | घरात काटेरी रोप लावल्यास काय होते? जाणून घ्या रंजक माहिती

22 April 2022 | 21 एप्रिल 2022, शुक्रवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहू वेळ

Surya Grahan 2022 | सावधान ! या सूर्यग्रहणला या राशींच्या व्यक्तींना लागणार ‘ग्रहण’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.