Raksha Bandhan 2024 : 18 की 19 ऑगस्ट… रक्षाबंधन नक्की कधी ? कन्फ्युजन करा दूर, राखी बांधण्याची योग्य वेळ…

Raksha Bandhan 2024 Kab Hai : राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण, जो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आनंदी जीवनसाठी प्रार्थना करते. जर तुम्हाला रक्षाबंधनच्या तारखेबद्दल कन्फ्युजन असेल, तर...

Raksha Bandhan 2024 : 18 की 19 ऑगस्ट... रक्षाबंधन नक्की कधी ? कन्फ्युजन करा दूर, राखी बांधण्याची योग्य वेळ...
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 6:57 PM

हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असते. या महिन्यात अनेक महत्वाचे सण, तिथी येतात. त्यापैकी रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या प्रेमाचा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येतो. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमाचे प्रतीक मानला जातो, ज्याची सर्व बहिणी आणि भाऊदेखील आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी सर्व बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी म्हणजेच बांधतात. तसेच त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी, यशासाठी प्रार्थना करतात. त्यानंतर भावांचे औक्षण करून, राखी बांधतात आणि एखादी मिठाई किंवा गोड पदार्थ त्यांना खिलवतात. या सणानिमित्त भाऊ त्यांच्या लाडक्या बहिणीला एखादी भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर त्यांचे संरक्षण करण्याचे वचनही.

मात्र, यंदा राखी पौर्णिमेच्या तारखेबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. याशिवाय भाद्र आणि पंचकची सावलीही रक्षाबंधनावर पडणार आहे. अशा परिस्थितीत, रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती आणि राखी बांधण्याची योग्य वेळ काय, हे जाणून घेऊया.

श्रावणी पौर्णिमा तारीख 2024

या वेळी श्रावणी पौर्णिमा ही 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2:21 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असेल. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण सोमवार, 19 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे.

या वेळेपर्यंत असेल भद्राची सावली

पंचांगानुसार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी 2:21 वाजून 21 मिनिटांनी भद्रा सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्ट रोजी पहाटे 1:24 पर्यंत राहील. भद्रामध्ये रक्षासूत्र बांधणे शुभ मानले जात नाही. त्यामुळेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 नंतर आहे.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता ?

वैदिक पंचांगeनुसार, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सोमवार, 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 ते संध्याकाळी 6:25 पर्यंत आहे. याशिवाय प्रदोषकाळात राखी बांधण्याची उत्तम वेळ संध्याकाळी 6:56 ते 9:08 आहे. यावेळी रक्षासूत्र बांधल्याने भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो, असे म्हणतात.

राखी कोणत्या हातात बांधावी ?

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते. धार्मिक शास्त्रांनुसार उजवा हात हा जीवनाच्या रोजच्या क्रियांचा हात असल्याचे सांगितले गेले आहे आणि देवतांचाही मनुष्याच्या उजव्या बाजूला वास असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो, त्यामुळे धार्मिक कार्यांनंतर उजव्या हाताला कलवा वगैरेही बांधले जाते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.