कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवावा? आवडता नैवेद्य दाखवल्याने मिळतो देवाचा आशिर्वाद

हिंदू धर्मात पूजेमध्ये अनेक विधी आहेत. आरती, अभिषेक याप्रमाणे नैवेद्य हा देखील महत्वाचा विधी आहे. याशिवाय पूजा अपूर्ण मानल्या जाते.

कोणत्या देवाला कोणता नैवेद्य दाखवावा? आवडता नैवेद्य दाखवल्याने मिळतो देवाचा आशिर्वाद
मोदकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 8:17 PM

मुंबई : प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भक्तीनुसार देवाची पूजा करतो. उपासना हा देवाप्रती आदर आणि प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तर राहतेच शिवाय व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला देवाचा आशीर्वादही मिळतो. त्याचप्रमाणे पूजेदरम्यान देवाला नैवेद्य अर्पण करणे ही देखील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. याला आपण विधी देखील म्हणू शकतो. प्रत्येक देवाला काही विशिष्ट मिष्टान्न प्रिय (Naivedya to god) आहे. या मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवल्यास साधकाची मनोकामना लवकर पूर्ण होते.

 भोलेनाथाला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य

भगवान शंकराचा आवडता महिना मानला जाणारा पवित्र महिना श्रावण सुरू आहे. अशा वेळी भोलेनाथाला दूध, दही, मध वगैरे अर्पण करावे. यामुळे ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. महादेवाला पांढऱ्या रंगाच्या मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवावा.

दूर्गा देवीला या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा

माता दुर्गाला नैवेद्य म्हणून हलवा आणि हरभरा अर्पण केल्याने माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याशिवाय मालपुआ, पुरण पुरी, खीर हे पदार्थही देवीला अधिक प्रिय आहेत. म्हणूनच हे पदार्थ माता दुर्गेला अर्पण करावेत.

हे सुद्धा वाचा

गणपतीचे आवडते पदार्थ

भगवान गणेश हे सनातन धर्मातील प्रथम पूजनीय देवता मानले जाते. मोदक आणि लाडू हे गणपतीचे आवडते खाद्य मानले जाते. अशा वेळी त्यांना मोदक, बेसन लाडू किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवा. या वस्तू अर्पण केल्याने श्रीगणेश प्रसन्न होतात आणि जीवनातील अडथळे दूर करतात.

हा प्रसाद बजरंगबलीला अर्पण करा

हनुमानजींना बुंदी खूप आवडते. अशा स्थितीत मंगळवारी हनुमानजींना बुंदी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. कारण मंगळवार हा हनुमानजींना समर्पित आहे. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.