Surya Grahan | आज सूर्यग्रहण, ‘या’ राशीने जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी….
ज्योतिष शास्त्राच्या मते, सूर्यग्रहणाचा विविध राशीतील लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो.
मुंबईः यंदाच्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (Solar Eclipse) आज 25 ऑक्टोबर रोजी मंगळवारी दिसणार आहे. भारतात तब्बल 27 वर्षानंतर हा योग येतोय. यापूर्वी 24 ऑक्टोबर 1995 साली दिवाळीतील अमावस्येला (Amavasya) खग्रास सूर्यग्रहण (Surya Grahan) दिसलं होतं. ज्योतिष शास्त्राच्या मते, सूर्यग्रहणाचा विविध राशीतील लोकांवर वेगवेगळा परिणाम होतो. मेष राशीतील लोकांनी या काळात जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
कोणत्या राशींसाठी ग्रहण कसे?
- मेष- मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवा कोणताही व्यवसाय सुरु करू नये. संसारात उन्नीस-बीस तर होतच असतं. पण हा महत्त्वाचा काळ आहे. अत्यंत काळजीपूर्वक नाती सांभाळावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावं. मुलांची काळजी घ्यावी.
- वृषभ- शत्रूंनाही लोळवाल. काही काळ मनःस्थिती डिस्टर्ब असेलस. पण शत्रूला अखेरीस चित कराल. पायाला दुखात होऊ शकते. आरोग्य मध्यम स्वरुपाचे असेल. व्यापारही योग्य चालेल. तांब्याच्या वस्तूंचे दान करा…
- मिथुन– या राशीच्या मुलांनी आरोग्याची उत्तम काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. मानसिक आरोग्यावरही काही परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापार मध्यम स्थितीत असेल. हिरव्या रंगाची वस्तू सोबत ठेवा.
- कर्क– छातीत थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः आईच्या आरोग्याची काळजी घ्या. जमीन, घर किंवा वाहन खरेदीत अडथळे येऊ शकतात. घरात भांड्याला भांडं लागण्याची शक्यता आहे. काळी वस्तू दान करा आणि लाल वस्तू जवळ बाळगा…
- सिंह– नाक कान घशाचा त्रास होऊ शकतो. व्यापारातही काहीसं नुकसान झेलावं लागू शकतं. सूर्यदेवाला जल अर्पण करत रहा. काळी वस्तू दान करा.
- कन्या– धनाचा क्षय होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करा. मुखरोग होऊ शकतो. डोळ्यांवरही बेतू शकतं. आरोग्य, प्रेम, अपत्य, व्यापाराबाबत मध्यम काळ आहे. सूर्यदेवतेला जल अर्पण करावे.
- तुळ– आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जीवनात अनेक अडथळे येऊ शकतात. आरोग्य मध्यम, प्रेम आणि अपत्य पूर्वीपेक्षा चांगले असेल. शनिदेवाची पूजा करा. सूर्यदेवाला जल अर्पण करा.
- वृश्चिक– डोळे, छाती दुखू शकते. किंवा कर्जाची स्थिती उद्भवू शकते. आरोग्य मध्यम राहिल. व्यापारही मध्यम. काळ्या वस्तूचे दान करा.
- धनु– आरोग्य मध्यम स्वरुपाचे असेल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. प्रशासनाकडून काही वाईट बातमी येऊ शकते. आर्थिक दडपण इतरांना देऊ नका. काळ्या वस्तूचे दान करा.
- मकर– नवा व्यवसाय आताच सुरू करू नका. आरोग्य थोडे सुधारले असेल. कोर्ट-कचेरीला सामोरे जावे लागू शकते. मा काली ची आराधना करा.
- कुंभ– प्रवासात अडथळे दिसतायत. अपमान सहन करावा लागू शकतो. गणेशाची आराधना करा. सूर्यदेवतेला जल अर्पण करा.
- मीन– जखम होण्याची शक्यता आहे. एखादं संकट उद्भवू शकतं. परिस्थिती प्रतिकुल असू शकते. भगवान शंकराची आराधना करा. जलाभिषेक करा. काळी वस्तू दान करा.
(टीप- ज्योतिष शास्त्रातील माहितीनुसार, उपरोक्त माहिती दिली आहे. उपरोक्त दाव्यांची हमी टीव्ही9 घेत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा टीव्ही9 चा कोणताही हेतू नाही. केवळ माहिती म्हणून सदर मजकूर दिलेला आहे. )