पूजा करताना देवाला अक्षता का अर्पण केल्या जातात, जाणून घ्या!

| Updated on: Mar 17, 2021 | 2:26 PM

पूजेत अक्षतांचं मोठं महत्त्व आहे. जर पूजेदरम्यान कुठली सामृग्री नसेल तर त्याची कमतरता (Why Akshat Offer To God) भरुन काढण्याचं काम अक्षता पूर्ण करतात.

पूजा करताना देवाला अक्षता का अर्पण केल्या जातात, जाणून घ्या!
Puja
Follow us on

मुंबई : पूजेत अक्षतांचं मोठं महत्त्व आहे. जर पूजेदरम्यान कुठली सामृग्री नसेल तर त्याची कमतरता (Why Akshat Offer To God) भरुन काढण्याचं काम अक्षता पूर्ण करतात. अक्षतांना अन्नामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. पण, काय तुम्हाला माहिती आहे का की पूजेदरम्यान अक्षता का अर्पित केली जातात? जाणून घ्या याबाबत (Why Akshat Offer To God During Worship) –

तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हाही देवाला अक्षता अर्पण करतो तेव्हा त्या अख्ख्या अक्षता असतात तुटलेले नाहीत. अक्षता म्हणजे ज्याला क्षती झालेली नसेल. जे पूर्ण असेल ते अक्षता. पूजेत अक्षता अर्पित करण्याचा भावार्थ हा असतो की आपली पूजाही अक्षतांप्रमाणे पूर्ण असो. यामध्ये कुठली बाधा येऊ नये. कुठल्याच प्रकारच्या विघ्नामुळे पूजा मध्येच तुटू नये म्हणजेच अपूर्ण राहू नये.

पांढऱ्या रंग असल्याने तांदळाला शांतीचं प्रतिकही मानलं जातं. अक्षतांच्या माध्यमातून भाविक भगवानला विनंती करतात की ज्याप्रकारे आमची तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे, तुम्हीही आमच्यावर पूर्ण कृपा ठेवा.

अक्षता सर्वात शुद्ध अन्न आहे

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं की मला अर्पण केल्याशिवाय जो कोणी अन्न आणि धनचा प्रयोग करेल, ती अन्न आणि धनची चोरी मानली जाईल. तांदळाला सर्वात शुद्ध अन्न मानलं जातं. कारण, हे धानाच्या आत बंद असतं. त्यामुळे पशु-पक्षी याला उष्ट करु शकत नाही. त्याशिवाय, ही देखील मान्यता आहे की प्रकृतीमध्ये सर्वात पहिले तांदळाची शेती केली गेली होती. अशात लोक या भावासोबत अक्षता अर्पण करत असाल तर आमच्याजवळ जे देखील अन्न आणि धन आहे ते तुम्हाला समर्पित आहे. या प्रकारे ते चोरीच्या अन्न आणि धनच्या पापातून मुक्त होऊन जातात.

ईश्वरच्या संतुष्टीचं साधन आहे अन्न

शास्त्रात अन्न आणि हवनला ईश्वराला संतुष्ट करणारं साधन मानलं जातं. अन्न अर्पण केल्याने भगवानासोबतच पितरही तृप्त होतात. अशात ईश्वरसोबत पितरांचाही आशीर्वाद मिळतो आणि घरात आनंद राहातो.

Why Akshat Offer To God During Worship

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘हे’ पाच गुण तुमच्यात असतील, तर तुम्ही जीवनात कुठली समस्या सोडवू शकता

उधारी टाळा अन्यथा समस्या वाढतील, मंगळवारी काय-काय करु नये?

घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात