पूजा करताना घंटी का वाजविली जाते ? मनातील इच्छापूर्तीशी आहे थेट संबंध
Garuda Ghanti : हिंदू धर्मात पूजा आणि देवाची आरती करता घंटीनाद केला जातो.तर मंदिरातही मोठ्या घंटा लटकलेल्या असतात. या घंटांचा नाद ऐकायला मधूर वाटतो. ही घंटा वाजवून मंदिरात आपण देवतेचा आशीर्वाद घेत असतो.त्यामुळे या घंटीवर कोणत्या देवतेचे चित्र असते हे आपण पाहायला हवे....
अनेक लोक देवतेची पूजा करताना हातात छोटी घंटी वाजवित आरती म्हणत देवतेची प्रार्थना करतात आणि देवतेचा आशीवार्द मागतात. हिंदू धर्मात घंटी वाजविणे आणि मंदिरातील घंटानादाला देखील खूप महत्व आहे. आरती गाताना आपण हाताने घंटा वाजवित असतो. देवाची प्रार्थना करताना घंटीनाद खूपच महत्वाचा असतो. त्यामुळे देवाची आराधना करताना वातावरण निर्मिती करण्यासाठी घंटी वाजवणे खूपच महत्वाचे असते. परंतू घंटानादाचा नेमका काय फायदा होतो ? या मागे वातावरण निर्मितीचा तर भाग असतोच. परंतू पूजा करताना घंटानादाचे एक वेगळेत महत्व आहे.यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.विज्ञानाच्या मते घंटानादाने त्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरी आजूबाजूच्या वातावरण सकारात्मकता आणतात. परंतू रोज घंटी वाजविणाऱ्यांना देखील हे माहिती नाही की घंटीच्या वरती कोणत्या देवेची मूर्ती असते?
घंटीच्या दांड्यावर गुरुड देवाचे चित्र असते. हिंदू धर्म मान्यतेनूसार गरुड देवाला भगवान विष्णूचे वाहन मानले जाते. घंटीच्या वरच्या दांड्याला असलेल्या गरुड देवाची प्रतिमा असते. गरुड देव विष्णू देवतेचे वाहक म्हणून भक्तांच्या इच्छा आणि आकांक्षांना विष्णू देवतेपर्यंत पोहचावाव्यात यासाठी या घंटीला गरुड घंटी असे म्हटले जाते. असेही म्हटले जाते की गरुड घंटानाद केल्याने कोणत्याही व्यक्तीला मोक्ष मिळतो.
गरुड घंटानादाने सकारात्मकता ऊर्जा
गरुड घंटी संदर्भात आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे हिंदू धर्माच्या मान्यतेनूसार निसर्गाची रचना ज्या नादाने झाली तसाच नाद गरुड घंटीमुळे निर्माण होतो. त्यामुळे गुरुड घंटीतून निघणाऱ्या या नादाला विशेष मानले जाते. या नाद खूपच ताकद देणारा असून त्यामुळे वातावरण सकारात्मक होते. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारावर घंटा लटकावलेली असते. म्हणजे भक्ताने मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवल्यानंतर वातावरणात सकारात्मकता येते.