Temple Bell : मंदिरात जाण्यापूर्वी घंटा का वाजवली जाते? जाणून घ्या कारण
मंदिरात दर्शनासाठी जाताना आपण आपसूक घंटा वाजवतो. पण त्यामागचं खरं कारण अनेकांना माहिती नसतं. तुम्हालाही यामागचं कारण माहिती नसेल तर जाणून घ्या.
मुंबई : हिंदू धर्मात पूजा पाठाचं खूप महत्त्व आहे. पूजा करताना अनेक विधी पार पाडल्या जातात. प्रत्येक विधीमागे काहीतरी कारण असतं. हिंदू धर्मात कुलस्वामिनी, कुलदैवत, राखणदार, ग्रामदेवता अशा अनेक देवतांचा पूजन केलं जातं. पण तुम्ही कधी मंदिरात गेला असाल तर गोष्ट आवर्जून पाहिली असेल ती म्हणजे घंटा..मंदिरात आल्या आल्या भाविक मोठ्या श्रद्धेने घंटा वाजवतो. घंट्यांचा आवाजामुळे परिसरात एक चैतन्य निर्माण होतं. पण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी घंटा वाजवण्यामागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात प्रवेश केल्या केल्या घंटा वाजवल्याने देवाच्या मूर्तीत चैतन्य निर्माण होते. पूजा करताना चांगलं फळ मिळतं. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्या केल्या घंटा वाजवली जाते. पुराणानुसार, मंदिरात घंटा वाजवल्याने जन्माजन्माचे पाप नष्ट होते. असं असलं तरी घंटा वाजवण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे.
धार्मिक कारण काय?
धर्मगुरुंच्या मते घंटा वाजवल्याने शरीरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. त्यामुळे मंदिर आणि मठात घंटा वाजवली जाते. त्याचबरोबर श्रद्धा असलेल्या भगवंताला आपण आल्याची जाण होते, असा भाव भक्तांचा असतो. त्यामुळे मंदिरात गेल्यानंतर घंटा आणि घरी पूजा करताना घंटी जरूर वाजवावी.
मंदिरात घंटा वाजवल्याने सकारात्मक कंप तयार होतो. या सकारात्मक कंपामुळे आसपासचे जीवाणू आणि विषाणूंचा नाश होतो. त्याचबरोबर वातावरणात सकारात्मकता येते. नकारात्मक ऊर्जा यामुळे दूर होते आणि सुख समृद्धीत येणाऱ्या अडचणी दूर होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)