Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?

बरेच वृद्ध कल्की अवताराबद्दल वेगवेगळे किस्से सांगत आहेत आणि या भीतीच्या वातावरणामध्ये कल्की अवताराबद्दल बरीच चर्चा होत आहे (Bhagvan Vishnu Kalki Avtar).

Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?
Kalki Avtar And Corona
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 1:26 PM

मुंबई : कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे आणि ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे (Bhagvan Vishnu Kalki Avtar). तसेच, देशातील अनेक शहरांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. कोरोना विषाणूमुळे आलेलं संकटे, तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की, आता कल्की अवताराची वेळ जवळ आली आहे. बरेच वृद्ध कल्की अवताराबद्दल वेगवेगळे किस्से सांगत आहेत आणि या भीतीच्या वातावरणामध्ये कल्की अवताराबद्दल बरीच चर्चा होत आहे (Why Bhagvan Vishnu Kalki Avtar Is In Discussion During This Corona Virus Pandemic Situation).

त्याचबरोबर लोकांना कल्की अवताराच्या चर्चेमुळे सर्वकाही संपण्याची भीती देखील आहे. अशा परिस्थितीत हा कल्की अवतार काय आहे आणि या काळात लोक याबद्दल का बोलत आहेत आणि का घाबरले आहेत. कल्की अवतार आणि या संकल्पनेशी संबंधित काही माहिती जाणून घेऊ.

कल्की अवतार काय आहे?

मान्यता आहे की, भगवान विष्णूचा आणखी एक अवतार होणार आहे, ज्याला आपण कल्की अवतार म्हणतो. हा भगवान विष्णूचा अवतार आहे, ज्याला कलियुगचा देव म्हणून देखील ओळखले जाते. असे म्हणतात की, कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू कल्की अवतार घेतील. कलियुगाच्या अंतिम कळात कल्की अवतार पृथ्वीवर अवरित होईल, त्यानंतर पापांचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाची सुरुवात होईल.

यावेळी कल्की अवताराची चर्चा का?

हिंदू धर्मात चार युगांचा उल्लेख आहे, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. असे म्हणतात की, आता कलियुग सुरु आहे आणि शेवटी कल्कीचा अवतार होईल. असेही म्हटले जाते की कल्कीचा अवतार अशा वेळी होईल जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल आणि सर्वत्र हाहाकार माजेल. यानंतर, भगवान कल्कीचा अवतार होईल, म्हणजेच भगवान विष्णू पृथ्वीवर येऊन पापींचा नाश करतील. यानंतर, कलियुग संपेल आणि पुन्हा एक नवीन युग सुरु होईल.

साध्या पद्धतीने सांगायचं झालं तर, कलियुगाच्या समाप्तीने सर्व काही संपेल आणि आता सर्वकाही समाप्त होण्याची वेळ आली आहे. बर्‍याच ठिकाणी याचा उल्लेख आहे की चार युग पुन्हा पुन्हा येतात आणि आता कलियुग संपणार आहे.

शास्त्रांमध्ये विष्णूच्या दहा अवतारांचा उल्लेख असल्याचेही मानले जाते, त्यापैकी त्यांनी आतापर्यंत नऊ अवतार घेतले आहेत. परंतु कलियुगात ते अद्याप त्यांचा अखेरचा अवतार झालेला नाही. मान्यता आहे की जेव्हा कलियुग शिगेला पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कल्कीचा अवतार घेतील आणि कलियुग संपवून धर्मयुग स्थापित करतील.

जाणकार काय सांगतात?

एपिक चॅनल्सच्या मालिकेत देवदत्त पट्टानायक यांनी कल्कीबाबत सांगितले आहे की, वेगवेगळ्या परंपरेत त्यांना एक तारणहार म्हणूनही पाहिलं जात जो वाईट आणि पापींपासून जगाला वाचवेल, सर्व काही नष्ट करेल आणि एक नवीन समाज निर्माण करेल. त्याचप्रमाणे असे म्हणतात की भगवान विष्णू कल्कीच्या रुपाने येतील आणि पुन्हा एकदा नवीन जगाचा निर्माण करतील.

Why Bhagvan Vishnu Kalki Avtar Is In Discussion During This Corona Virus Pandemic Situation

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.