आरती करताना कापूर का जाळतात? जाणून घ्या फायदे आणि महत्व
हिंदू धर्मामध्ये आरती करताना कापूर जाळण्याचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. पूजेमध्ये कापुराला विशेष स्थान आहे आणि ते जाळण्यामागे अनेक कारणे आहेत.
हिंदू संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये दररोज सकाळ, संध्याकाळ पूजा केली जाते. पुजे नंतर आरती करण्याला विशेष महत्त्व आहे. आरती केल्यानंतर कापूर जाळला जातो. कापूर हे शुद्धीकरण आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते आणि कापूर जाळल्याने पर्यावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
कापूराचा धूर विशेषतः हा दैवी आणि शुद्ध मानला जातो. जो पूजा स्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरतो. याशिवाय कापूर जाळल्याने वातावरणात सुगंध पसरल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळणे हे अग्नीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते. जे पवित्रता, शक्ती आणि आंतरिक प्रकाशाचे प्रतिक आहे.
परंपरा
हिंदू धर्मात कापूर जाळण्याची परंपरा शतकानूशतके जुनी आहे. कापूर हे पवित्रता आणि दैवत्वाचे प्रतीक मानले जाते. विशेषतः पूजा, आरती, हवन आणि धार्मिक विधींमध्ये याचा वापर केला जातो. कापूर जाळणे ही हिंदू धर्मातील एक प्रतिकात्मक क्रिया आहे. जी भक्तांच्या मनाला शांती आणि एकाग्रता प्रदान करते.
प्रकाशाचे प्रतीक
कापूर हे अग्नीचे प्रतीक मानले जाते. जे शुद्धीकरण, शक्ती आणि ऊर्जेचे देखील प्रतीक आहे. आरती दरम्यान कापूर जाळणे हे दर्शवते की आपण अंधारातून प्रकाशाकडे आणि नकारात्मकतेकडून कडून सकारात्मकतेकडे जात आहे. ही जळणारी कापूर ज्योत आपल्यातील वाईट गोष्टी दूर करण्याचे आणि आपल्याला देवत्वाकडे नेण्याचे देखील प्रतीक मानले जाते.
वास्तुदोष
वास्तुशास्त्रानुसार कापूर जाळल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे घराच्या सर्व भागात शांतता राहते. घरामध्ये दररोज कापूर जाळल्याने केवळ वातावरण शुद्ध होत नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासही ते उपयुक्त मानले जाते. कापूरच्या धुरामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचे परिसंचलन वाढते. जेव्हा कापूर जाळला जातो तेव्हा त्याचा प्रकाश आणि शुद्ध धूर वातावरण शुद्ध करतो. त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते.
आरोग्यदायी फायदे
कापूराचा धूर एक नैसर्गिक जंतू नाशक आहे. जो हवा शुद्ध करतो आणि जिवाणू नष्ट करतो. तसेच मानसिक ताण कमी होण्यास आणि शांतता प्रदान करण्यास मदत होते. त्यामुळे पूजेदरम्यान ध्यान आणि भक्ती वाढते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)