मृत्यूनंतर का करतात पिंडदान आणि वर्षश्राद्ध? असे आहे यामागचे कारण
देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जात असले तरी बिहारच्या फाल्गु किनार्यावर वसलेल्या गयामध्ये पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रभू राम आणि देवी सीता यांनीही गयामध्ये पिंडदान केले होते, असे म्हटले जाते.
मुंबई : हिंदू धर्मात मृत्यूनंतर पिंडदानाला विशेष महत्त्व आहे पण पिंडदान (Pindadan Importance) म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का? वास्तविक ‘पिंड’ या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूचे गोलाकार रूप असा होतो. लाक्षणिकदृष्ट्या, शरीराला पिंड देखील म्हणतात. मृतांसाठी अर्पण केलेला भात, दूध आणि तीळ यांसारख्या पदार्थांचे मिश्रण करून तयार केलेल्या वस्तुस सपिंडीकरण म्हणतात. माता आणि पितृ गुणसूत्र प्रत्येक पिढीमध्ये असतात. पौराणिक मान्यतेनुसार, ऋषी आणि संतांसाठी पिंडदान केले जात नाही कारण ते सांसारिक आसक्तीपासून वेगळे मानले जातात. श्राद्धात जे भाताचे पिंड बनवले जातात त्यामागेही तत्वज्ञान दडलेले असते. जे आता देहात नसून मृत्त्यू झालेला आहे त्यांनाही नऊ तत्वांचा देह आहे. हा भौतिक देह नसून आत्मिक आत्मिक देह असतो.
मृत्यूनंतर पूर्वजांचे पिंडादान केले जाते जेणेकरून त्यांच्या शरीरातील आसक्ती मुक्त होते आणि ते पुढील प्रवास सुरू करू शकतात. ते दुसरे शरीर किंवा मोक्ष मिळवू शकतात. धार्मिक ग्रंथांमध्ये, मृत्यूनंतर भूतांपासून संरक्षण करण्यासाठी पितरांचे पिंडदान करण्याचे खूप महत्त्व आहे.
पिंडदान कुठे आणि का होते ते जाणून घ्या
देशात अनेक ठिकाणी पिंडदान केले जात असले तरी बिहारच्या फाल्गु किनार्यावर वसलेल्या गयामध्ये पिंडदानाचे खूप महत्त्व आहे. राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रभू राम आणि देवी सीता यांनीही गयामध्ये पिंडदान केले होते, असे म्हटले जाते. त्र्यंबकेश्वर, हरिद्वार, गंगासागर, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र, चित्रकूट, पुष्कर, बद्रीनाथसह 60 ठिकाणे श्राद्धासाठी महत्त्वाची मानली गेली आहेत. शास्त्रांमध्ये पिंडदानासाठी यापैकी तीन स्थाने सर्वात खास मानली गेली आहेत. बद्रीनाथचाही त्यात समावेश आहे. बद्रीनाथजवळील ब्रह्मकपाल सिद्ध परिसरात पितृदोषमुक्तीसाठी तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे.
हरिद्वारमधील नारायणी शिलाजवळ लोकं त्यांच्या पूर्वजांना पिंडदान करतात. बिहारची राजधानी पटनापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या गयामध्ये वर्षातून एकदा 17 दिवस जत्रा भरते. विष्णुपद मंदिराजवळ आणि फाल्गु नदीच्या काठी अक्षयवटजवळ पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. गरुड पुराणात असे म्हटले आहे की गयाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना टाकलेले प्रत्येक पाऊल पूर्वजांना स्वर्गात जाण्यासाठी एक रस्ता बनवतात.
श्राद्ध, पिंडदान, कर्म पुत्राद्वारेच का?
सर्वांनाच हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, श्राद्ध आणि पिंडदान करण्याचा अधिकार फक्त पुत्राला का आहे? तर हे जाणून घ्या की जो पु नावाच्या नरकापासून वाचवतो त्याला पुत्र म्हणतात. म्हणूनच नरकापासून रक्षण करण्यासाठी आस्तिकांना पुत्रप्राप्तीची इच्छा असते आणि याच कारणामुळे पिंडदान, श्राद्ध इत्यादी विधी करण्याचा अधिकार पुत्राला देण्यात आला आहे. आपले धर्मग्रंथ सांगतात की ज्या सत्पुरुषांना पुत्रप्राप्ती होते त्यांना कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही आणि पुत्राचे मुख पाहून पिता आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो आणि श्राद्ध झाल्यावर ती व्यक्ती स्वर्गात जाते. एकापेक्षा जास्त पुत्र असल्यास, श्राद्ध विधी ज्येष्ठ पुत्रानेच करावा. इतर भावांनी वेगळे काही करण्याची गरज नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)