लग्नात नवरी का लावते मेहेंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण?

लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूचे तेज वाढते आणि तिचे सौंदर्य वाढते. हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे.

लग्नात नवरी का लावते मेहेंदी? 99 टक्के लोकांना नाही माहिती यामागचे कारण?
मेहेंदीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 2:48 PM

मुंबई : भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भारतात, विवाह हा एक सामाजिक परंपरा आहे ज्यामध्ये दोन लोकं वेगवेगळ्या परंपरा आणि विधींचे पालन करून एकत्र होतात. या विवाह विधींपैकी एक म्हणजे मेहंदी (Mehandi Importace in Marriage) ज्यामध्ये ती वधू आणि वरांच्या हातावर आणि पायावर लावली जाते. लग्नात मेहंदी लावण्याचा विधी बहुतेक राज्यांमध्ये प्रचलित आहे. लग्नाच्या काही दिवस आधी हा विधी केला जातो. यामध्ये वधूच्या हातावर आणि पायावर मेंदी लावून सुंदर आणि आकर्षक डिजाईन बनवल्या जातात. हा विधी वधू आणि वरच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांद्वारे केला जातो. मात्र लग्नात मेहेंदीला इतके महत्त्व का आहे? यामागचे कारण अनेकांना नाही माहिती.

हा विधी का केला जातो?

लग्नात मेहंदी लावण्याच्या विधीला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. याशिवाय मेहंदीला सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. या विधीमुळे वधूचे तेज वाढते आणि तिचे सौंदर्य वाढते. हिंदू धर्मात 16 अलंकारांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये मेहंदी देखील समाविष्ट आहे. मेहंदी वधूचे सौंदर्य वाढवते. मेहंदी हे प्रेमाचे लक्षण मानले जाते, त्याच्या रंगाबद्दल असे म्हटले जाते की मेहंदीचा रंग जितका उजळेल किंवा मेहेंदी जितकी रंगेल  तितके जास्त वधूच्या जोडीदाराचे तिच्यावर प्रेम असते. मेहंदीचा चमकदार रंग वधू आणि वरांसाठी खूप भाग्यवान असतो.

हे सुद्धा वाचा

मेहंदी लावणयाचे लाभ?

असे मानले जाते की लग्नाच्या वेळी वधू आणि वर दोघांनाही खूप चिंता वाटते. मेहंदीची प्रकृती थंड असते त्यामुळे ती शरीराचे तापमान राखून शरीराला थंडावा देते. त्यामुळे वधू-वरांना मेहंदी लावली जाते. इतकेच नाही तर प्राचीन काळी मेंदीचा उपयोग आयुर्वेदिक औषध म्हणूनही केला जात असे. लग्नात मेहेंदी लावण्याची पद्धत हिंदू, मुस्लिम आणि इतर अनेक धर्मांमध्ये आहे. मेहेंदी ही शुभ प्रतिक माणल्या जात असल्याने ती लग्नात लावली जाते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.