Ram Mandir : प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मूर्तीच्या डोळ्यावर का बांधली जाते पट्टी? जाणून घ्या कारण
संपूर्ण जगात राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठपनेबाबत उत्साह आहे. प्रत्येक चौकाचौकात राम मंदिराबाबत चर्चा होत आहे. प्रभू राम 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिरात विराजमान होणार आहे. प्रभू रामांची मूर्ती मंदिरात बसवली गेली आहे. या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे. पण असं का ते जाणून घ्या
मुंबई : प्रभू रामांच्या स्वागतासाठी संपूर्ण अवधनगरी सज्ज झाली आहे. अयोध्येसह संपूर्ण जगात उत्साहाचं वातावरण आहे. जगभरातील भाविक या सोहळ्याकडे उत्साहाने पाहात आहेत. 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होत आहेत. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना होणार आहे. प्रभू रामचंद्रांची मूर्ती मंदिरात बसवण्यात आली आहे. शिल्पकार योगीराज यांनी घडवलेली कृष्णवर्णीय बालस्वरुपातील राम मूर्ती मंदिरात बसवली गेली आहे. पण या मूर्तीचे डोळे पट्टीने झाकण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभू रामांच्या भक्तांची आतुरता आणखी वाढली आहे. प्रभू राम आपल्याकडे कधी पाहतील अशी प्रत्येक राम भक्ताची इच्छा आहे. असं असताना डोळ्यावर पट्टी बांधण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील अनेक भाविकांना पडला आहे. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या त्या मागचं कारण..
वैदिक शास्त्रानुसार, मूर्ती बनवण्यापासून ती गाभाऱ्यात बसवेपर्यंत त्यात प्राण नसतो. ती केवळ एक दगडी मूर्ती असते. त्या मूर्तीत चेतना आणि प्राण जागवण्यासाठी काही विधी केल्या जातात. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी त्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. 22 जानेवारीला फक्त 84 सेकंदांचा मुहूर्त आहे. ‘प्रतितिष्ठत परमेश्वर’ या दोन सेकंदाच्या मंत्राचा जाप केला जाईल. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मूर्तीत प्राण येईल आणि डोळ्यावरील पट्टी दूर केली जाईल. यावेळी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर आरसा धरला जाईल.
उत्तर प्रदेश: अयोध्या में राम मंदिर के गर्भगृह के अंदर से भगवान राम की मूर्ति की झलक।
(सोर्स: शरद शर्मा, मीडिया प्रभारी विश्व हिंदू परिषद) pic.twitter.com/gHghFT8BQh
— ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2024
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा आई आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा त्या बाळाच्या डोळ्यांवर कपडा ठेवला जातो. जेणेकरून प्रखर प्रकाशाचा डोळ्यांवर प्रभाव पडणार नाही. त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठेवेळी जलाधिवास, गंधाधिवास, धान्याधिवास या विधी पार पडल्यानंतर मूर्तीत तेज येते. याचवेळी नेत्रोन्मूलन विधी होतो आणि डोळ्यांना मध लावून डोळे एका पट्टीने बंद केले जातात.
नेत्रोन्मूलन विधीमुळे डोळ्यांमध्ये एक तेज निर्माण होतं. त्या नजरेचा वेग अधिक असतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे पट्टी काढण्यापूर्वी समोर आरसा ठेवला जातो. त्यामुळे त्यामुळे प्रभावी तेज पुन्हा मूर्तीत जात आणि कोणालाही इजा होत नाही. या प्रक्रियेत अनेकदा आरसा फुटतो, असं बोललं जातं. पण आरसा फुटणं शुभ मानलं जातं. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामाचं दर्शन 23 जानेवारीपासून सामान्य भाविकांना होणार आहे.