लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात? तुम्हाला माहिती आहे का कारण?

मंगळसुत्राला सौभाग्याचा अलंकार मानल्या जाते. लग्नात वधूला मंगळसुत्र घालण्यामागे अनेक कारणं आहेत. ही परंपरा अगदी ऋषी मुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. ही पद्धत सुरू करण्यामागे काही विशेष कारण होते असं अभ्यासकांचं मत आहे. जाणून घेऊया मंगळसुत्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.

लग्नात मंगळसुत्र उलटे का घालतात? तुम्हाला माहिती आहे का कारण?
मंगळसुत्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 8:54 AM

मुंबई : हिंदू धर्मात अनेक रूढी आणि परंपरा या शतकानुशतके चालत आलेल्या आहेत. लग्न परंपरा हीसुद्धा त्यापैकीच एक आहे. हिंदू धरमात लग्नाला अतिशय पवित्र स्थान दिले आहे. लग्नात सिमांत पुजनापासून ते मांडव परतणीपर्यंत अनेक विधी असतात. प्रत्त्येक विधीला काही ना काही महत्त्व सांगण्यात आले आहे. त्या पैकीच एक म्हणजे लग्न झाल्यानंतर नववधू मंगळसुत्र (Mangalsutra) उलटे घालते. किमान सव्वा महिना तरी ते उलटे घालावे असं गुरूजी सांगतात, मात्र यामागचं खरं कारण काय आहे हे तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? पंडित माधवशास्त्री पांडे यांनी शास्त्रामागचे कारण सांगितले आहे.

मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण

पुर्वीच्या काळी अगदी कमी वयातच मुलींचे लग्न व्हायचे. लग्न झाल्यानंतरही मुलींना वयात येण्यासाठी काही काळ बाकी असायचा. हे वय मुलीला आई बनण्यासाठी योग्य नाही त्यामुळे मुलगी वयात येणे तसेत तीची मासीक पाळी सुरू होणे अद्याप बाकी आहे हे कळण्यासाठी ती मंगळसुत्र उलटे घालायची. वयात आल्यानंतर ते सरळ करण्यात यायचे. हे खरंतर मंगळसुत्र उलटे घालण्यामागचे कारण आहे.

लग्नात मंगळसुत्राला का महत्त्व आहे?

अभ्यासकांच्या मते मंगळसुत्राला इतके महत्त्व देण्यामागे काही कारणे आहे. लग्न झाल्यानंतर दोन मंगळसुत्र घालण्यात येतात. एक सासरचं आणि एक माहेरचं असतं. सासरचं मंगळसुत्र हे छातीच्या खाली पोटापर्यंत असतं. मंगळसुत्रात दोन सोन्याच्या वाट्या आणि किमान चार काळे मणी असावे. मंगळसुत्राच्या वाट्यांमुळे मुलीच्या हृदयाला सकारात्मक उर्जा प्राप्त होते. लग्न झाल्यानंतर मुलीला सासरी जावे लागते. नवीन वातारणाशी जुळवून घेण्यासाठी तीला अनेक तडजोडी कराव्या लागतात. अशा वेळी तीला मानसीक ताणही येतो. मंगळसुत्रामुळे निर्माण झालेली उर्जा मुलीला काही प्रमाणात बळ देते.

हे सुद्धा वाचा

मंगळसुत्र हे स्त्री विवाहीत असल्याचे दर्शवते.समाजात वावरतांना बऱ्याचदा लोकांची वाईट नजर महिलेवर पडते. अशावेळी तीच्यासाठी हक्काचा पुरूष तीच्यासोबत आहे असा अलिखीत संदेश समाजात जातो. याशिवाय काळे मणी हे नकारात्मक उर्जेपासूनही बचाव करतात. बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल मंगलसुत्र उपलब्ध आहे. मात्र जाणकार लोकं आजही दोन सोन्याच्या वाट्या असलेल्या मंगळसुत्रालाच प्राधान्य देतात.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.