हिंदू धर्मात का केली जाते पिंपळाच्या झाडाची पुजा? यामुळे कोणते लाभ मिळतात?
पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत, जी या झाडाची वैशिष्टे आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो
मुंबई : हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला (Peepal Tree) विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्वसुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे करते. धार्मिक कार्यात पीपळाच्या झाडाला इतके महत्त्व का जाते या मागे अनेक कारणे आहेत.
पीपळाच्या झाडामध्ये भगवान कृष्णाचे निवास
पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद्भागवत गीतेत त्यांनी स्वतः सांगीतले आहे. अर्जुनाला उपदेश करताना, श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थ: अहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या 10 व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पीपळ वृक्ष आहे, म्हणजेच स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात.
पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत, जी या झाडाची वैशिष्टे आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी, या झाडावर फळे उगवत नाहीत. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पीपळाचे झाड शेकडो वर्षे जगते. पृथ्वीवर अनंतकाळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते.
शनिदेवाचा पिपळ वृक्षाशी संबंध
एका जुन्या आख्यायिकेनुसार, महर्षी दधिची यांचे पुत्र मुनी पिप्पलाद यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला देवांकडून घ्यायचा होता. त्याचा कोप टाळण्यासाठी देवतांनी सांगितले की, त्यावेळी शनिदेवाची दृष्टी ठीक नव्हती, त्यामुळे तोच खरा अपराधी आहे. हे कळल्यानंतर पिप्पलद शनिदेवावर ब्रह्मास्त्र अग्नी करणार होते. तेव्हा शनिदेवाने त्यांच्यासमोर माफी मागितली आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला त्रास देणार नाही अशी शपथ घेतली.
मुनी पिप्पलाद हे पिंपळाच्या झाडाशी संबंधित होते कारण ते त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर पीपळाच्या झाडाखाली वाढले होते. तेव्हापासून पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा कोप कमी होतो.
स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि सर्व देवदेवता त्याच्या पानांमध्ये वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)