मंगळवारला हनुमानाचा दिवस का मान्यल्या जाते? या दिवशी केलेल्या उपासनेचे मिळते विशेष फळ
असे मानले जाते की मंगळवारी विधीवत बजरंगबलीची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व दुःख हरण करतात.
मुंबई : हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. तसेच मंगळवार हा रामभक्त हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने भक्तांना विशेष लाभ होतो. हनुमानजींना संकटमोचक असेही म्हणतात कारण ते आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. पौराणिक मान्यतेनुसार बजरंगबलीचा जन्म मंगळवारीच झाला होता. या कारणास्तव, हा दिवस त्यांच्या पूजेला समर्पित आहे. यामुळेच मंगळवारी हनुमानजींचे व्रत केले जाते. या दिवशी उपवास केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात. त्याचबरोबर हनुमानजींसोबत मंगळाचा संबंधही मानला जातो, त्यामुळे मंगळवारी हनुमानजींची पूजा (Mangalawr Puja) केली जाते.
या दिवशी पूजा केल्याने काय फायदे होतात?
असे मानले जाते की मंगळवारी विधीवत बजरंगबलीची पूजा केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांचे सर्व दुःख हरण करतात. या दिवशी व्रत आणि सुंदरकांड पठण केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव दूर होतो. या दिवशी ‘ओम श्री हनुमंते नमः’ या मंत्राचा जप केल्यास विशेष फळ मिळते.
मंगळवारी उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा
मंगळवारच्या व्रतामध्ये पवित्रतेकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. पूजेच्या वेळी मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. या दिवशी उपवास केल्यास मीठाचे सेवन करू नये. यासोबतच तुम्ही कोणतीही गोड वस्तू दान केली तर ती स्वतः स्वीकारू नका. मंगळवारच्या व्रतामध्ये काळे किंवा पांढरे कपडे घालून हनुमानजींची पूजा करू नये. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे चांगले. उपवास करणाऱ्याने दिवसातून एकदाच जेवण करावे.
मंगळवारचे उपाय
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगल दोष असेल तर त्याला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा परिस्थितीत मंगळवारी अवलंबलेला हा उपाय खूप प्रभावी ठरतो. मंगळवारी एक नारळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या नदीत अर्पण करा. हा उपाय 7 मंगळवारपर्यंत करा. यामुळे तुमच्या पत्रिकेत मंगळ बलवान होईल.
घरात सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची असेल, जीवनात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांना गूळ, हरभरा आणि मुग अर्पण करावी. यानंतर माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घालणे देखील शुभ आहे. हे 21 मंगळवारपर्यंत करावे. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)